Video : डोमिनोज पिझ्झाच्या पीठावर ठेवलेय टॉयलेटचे ब्रश; फोटो व्हायरल होताच युजर्सचा संताप

Video : डोमिनोज पिझ्झाच्या पीठावर ठेवलेय टॉयलेटचे ब्रश; फोटो व्हायरल होताच युजर्सचा संताप

सध्या अनेकांना पिझ्झाचे वेड लागले आहे. घरात काय फंक्शन असेल, मित्र मैत्रिणींची भेट असेल यात पिझ्झा आवडीने ऑर्डर करणे आलेच. यात डोमिनोज पिझ्झा सर्वाधिक फेमस आहे. मात्र तो पिझ्झा स्वच्छ ठिकाणी बनवणेही तितकेच गजरेचे आहे. पण तुम्ही खात असलेला पिझ्झ्याच्या पिठावर टॉयलेट ब्रश आणि लादी पुसायचे वाइप्स ठेवले असे तर तुम्हाला कसं वाटेल? असाच काहीसा निष्काळजीपण डॉमिनोज इंडियाच्या एका स्टोअरमध्ये पाहायला मिळाला. ज्याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ बंगळुरुमधील असल्याचे म्हटले जातेय.

पिठाच्या ट्रेवर टांगत ठेवले टॉयलेट ब्रश

साहिल कर्नेनी नावाच्या एका युजर्सने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पिझ्झ्याच्या पिठाच्या ट्रेवर टॉयलेट ब्रश आणि लादी पुसायचा मॉप यांसारख्या वस्तू टांगत ठेवल्याचे दिसतेय. बंगळुरुच्या होसा रोडवरील डॉमिनोज आऊटलेटचे हा फोटो असल्याचा दावा त्याने केला आहे.

साहिलने हा फोटो आणि व्हिडीओ ट्विट करत म्हटले की, डोमिनॉज इंडिया आपल्याला अशाप्रकारचा पिझ्झा खायला देत आहे, हे खूप निराशाजनक आहे. फोटो बंगळुरुचा आहे.

यावर डोमिनोजने उत्तर दिले की, कंपनी आपल्या परिचालनच्या मानकांना प्रतिबंध करण्यासाठी जीरो टॉलरेंसची नीति अवलंबते. मात्र याची पूर्ण तपासणी सुरू आहे. संपूर्ण कार्यक्रमावर पिझ्झाच्या दिग्गज कंपनीने म्हटले आहे की, आपण या प्रकरणाची तपासणी करत आहोत आणि ग्राहकांची सुरक्षा आणि हित सुनिश्चित करणे यासाठी आवश्यक ती पाऊले उचलत आहोत.

युजर्सने आरोग्यमंत्र्यांना केले टॅग

युजर्सने या पोस्टसह भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, आरोग्य मंत्रालय, कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना देखील हे टॅग केले आहे. यावर युजर्सने लिहिले की, ‘हे चित्रे बेंगळुरूमधील डॉमिनोज आउटलेटचे आहेत ज्यात पिझ्झाच्या पीठाच्या ट्रेवर मॉप टांगत ठेवले आहे. कृपया घरी शिजवलेले अन्न खाण्यास प्राधान्य द्या.’

ट्विटरवर युजर्सचा संताप

ही पोस्ट पोस्ट इंटरनेटवर आणि ट्विटरवर व्हायरल झाली आणि लोक डॉमिनोज इंडियावर संतापले आहेत. एकामागून एक युजर्सने हा फोटो शेअर करत डॉमिनोजला गोत्यात टाकले. यानंतर पिझ्झा रेस्टॉरंट चेनने या घटनेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करत असल्याचे सांगितले.


खातेवाटपावर शिंदे गटातील आमदार नाराज नाहीत, शंभूराजे देसाईंनी केले स्पष्ट


First Published on: August 16, 2022 12:08 PM
Exit mobile version