‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे थेट अंतराळातून दर्शन

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे थेट अंतराळातून दर्शन

सौजन्य- ट्वीटर

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या जगातील सर्वात उंच पुतळ्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील नर्मदा नदीच्या किनाऱ्यावार उभारण्यात आलेला सरदार वल्ल्भाई पटेल यांचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘ची उंची तब्बवल १८३ मीटर अर्थात ५९७ फूट इतकी आहे. या पुतळ्याची भव्यता इतकी आहे की पर्यटकांना तो ७ किलोमीटर दूर अंतरावरुनच स्पष्ट दिसतो. मात्र, हा महाकाय पुतळा अंतराळातून कसा दिसतो, याचा एक फोटो नुकताच समोर आला आहे. ‘प्लॅनेट’ या अमेरिकेतील कमर्शियल सॅटेलाईट नेटवर्कने थेट  अवकाशातून या १८२ मीटर उंच पुतळ्याच फोटो कॅमेरात कैद केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो तूफान व्हायरल होत असून, लोक या फोटोद्वारे थेट अंतराळातून स्टॅच्यू ऑफ युनिटीचे दर्शन घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच  ‘प्लॅनेट’ने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन हा फोटो ट्वीट केला होता. काही दिवसांपूर्वी ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’मधून दिसणाऱ्या नर्मदा नदीचे आणि आजूबाजूच्या नयनरम्य परिसराचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र, आता या पुतळ्याचाच अवकाशातून घेतलेला हा भन्नाट फोटो इंटरनेटवर व्हायरल होतो आहे.


अवकाशातून दिसणाऱ्या मोजक्या वास्तू

स्टॅच्यू ऑफ युनिटी‘ व्यतिरीक्त जगात काही मोजक्याच मानवनिर्मीत वास्तू आहेत ज्या अवकाशातून स्पष्ट दिसतात. माणसाने निर्माण केलेल्या अशी काही संरचना आहेत ज्यांचे स्पष्ट छायाचित्र अवकाशातून घेतले जाऊ शकते. यामध्ये इजिप्तचं पिरॅमीड ऑफ गीजा, दुबईच्या किनाऱ्यावर असलेलं पाम आयलंड यांचा समावेश आहे. त्यामध्ये आता अहमदाबादमधील या भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटीचाही समावेश झाल आहे.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची वैशिष्ट्यं 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार या भव्य पुतळ्याची उभारणी करण्यासाठी एकूण ५ वर्षांचा कालावधी लागला. याशिवाय पुतळाची निर्मिती करण्यासाठी तब्बल २ हजार ९८९ करोड रुपये इतका खर्च झाला. विशेष म्हणजे निर्माणकर्त्यांनी हा पुतळा भूकंपरोधक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवला आहे. ही भव्य प्रतिमा उभारण्यासाठी ४ हजार ७६ कर्मचऱ्यांचे मनुष्यबळ लागले, ज्यामध्ये २०० कर्मचारी चीनचे होते.

First Published on: November 19, 2018 2:39 PM
Exit mobile version