सोशल मीडिया पोस्टवरून कर्नाटकच्या हुबळीमध्ये हिंसाचार; 12 पोलीस जखमी, 40 जणांना अटक

सोशल मीडिया पोस्टवरून कर्नाटकच्या हुबळीमध्ये हिंसाचार; 12 पोलीस जखमी, 40 जणांना अटक

सोशल मीडिया पोस्टवरून कर्नाटकच्या हुबळीमध्ये हिंसाचार; 12 पोलीस जखमी, 40 जणांना अटक

कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील जुन्या हुबळी पोलीस स्टेशनवर शनिवारी रात्री जमावाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीच्या घटनेत 12 पोलीस जखमी झालेत. यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 40 जणांना अटक केली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडाव्या लागल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या शहरात दारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

हुबळी-धारवाडचे पोलिस आयुक्त लाभ राम म्हणाले की, या हिंसाचाराच्या घटनेत सहभागी असलेल्यां आरोपींविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जमावाने पोलिसांच्या वाहनांचेही नुकसान करण्याचा प्रयत्न केला.

एका व्यक्तीने सोशल मीडियावर मुस्लिम समुदायाला लक्ष्य करून आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती, ज्यावर इतरांनी आक्षेप घेत पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. परंतु कारवाईवर समाधान न झाल्याने मध्यरात्री पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने तक्रारदार जमा झाले आणि त्यांनी गोंधळ घातला. मात्र या गोंधळाने अगदी हिंसक वळण घेतले. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

त्याचवेळी राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले की, “या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या काही लोकांना अटक करण्यात आली आहे. हा एक पूर्व नियोजित हल्ला होता.


Chhavi Mittal Breast Cancer : अभिनेत्री छवी मित्तल ब्रेस्ट कॅन्सरची शिकार; सोशल मीडियावर व्यक्त केल्या वेदना


First Published on: April 17, 2022 2:49 PM
Exit mobile version