अखेर गूढ उकललं! प्रेमसंबंधातून झाली विश्व हिंदू महासभा अध्यक्षांची हत्या!

अखेर गूढ उकललं! प्रेमसंबंधातून झाली विश्व हिंदू महासभा अध्यक्षांची हत्या!

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी सकाळी विश्वहिंदू महासभेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष रणजीस बच्चन यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशमध्ये खळबळ माजली होती. विरोधी संघटनांवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप देखील झाले. मात्र, अखेर रणजीत बच्चन यांची हत्या पत्नीच्या प्रेमसंबंधातून झाल्याचं उघड झालं आहे. खुद्द उत्तर प्रदेश पोलिसांनीच हे जाहीर केलं आहे. त्यामुळे बच्चन यांच्या हत्येचं गूढ उकललं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

काय झालं होतं?

रविवारी सकाळी सहाच्या सुमारास रणजीत बच्चन लखनौच्या हजरतगंज परिसरामध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आदित्य कुमार श्रीवास्तव हे देखील होते. परिसरातल्या ग्लोक पार्कजवळ हे दोघे येताच बाईकवरून आलेल्या दोन अज्ञातांनी बच्चन यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये रणजीत बच्चन यांचा जागीच मृत्यू झाला, तर आदित्य श्रीवास्तव यांना देखील गोळी लागल्याने ते जखमी झाले.

पत्नीच्या अफेअरमुळे घडली हत्या

रणजीत बच्चन यांचं हे दुसरं लग्न होतं. पत्नी स्मृति श्रीवास्तव हिचे देवेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांना लग्न करायचं होतं. मात्र, रणजीत पत्नीला घटस्फोट द्यायला नकार देत होते. गेल्या महिन्यात १७ जानेवारीला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. रणजीत यांना बाहेर जेवायला जायचं होतं, पण त्याला स्मृतीने नकार दिला. त्यावर भडकलेल्या रणजीत यांनी थेट स्मृतीच्या कानशिलात भडकावली. हे कळताच स्मृतीचा प्रियकर देवेंद्र भडकला. त्याने रणजीत यांना जीवे मारण्याचा निश्चय केला.

कशी झाली अटक?

देवेंद्रने त्याचा साथीदार संजीत गौतम याला सोबत घेऊन रणजीत यांच्या हत्येचा कट रचला. रविवारी सकाळी शूटर जीतेंद्र त्याच्या साथीदारासोबत बाईकवरून आला आणि त्याने रणजीत बच्चन आणि आदित्य श्रीवास्तव यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येसाठी देवेंद्रला स्मृतीनेच भरीस पाडलं होतं. लखनौच्या विकासनगरमधल्या बच्चन यांच्या घरातून पोलिसांनी स्मृतीला अटक केली आहे. तर देवेंद्रला उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश सीमा भागातून अटक करण्यात आली आहे. गोळी झाडणाऱ्या जितेंद्रला मुंबईतून अटक झाली आहे अद्याप फरार आहे.


वाचा सविस्तर – रणजीत बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या
First Published on: February 7, 2020 9:43 AM
Exit mobile version