घरताज्या घडामोडीविश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या

विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या

Subscribe

लखनौमध्ये विश्व हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष रणजीत बच्चन यांची आज सकाळी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे. बाईकवरून आलेल्या अज्ञातांनी गोळाबार करून हत्या केली आहे. रणजीत बच्चन हजरगंज भागातून मॉर्निंग वॉकला गेले असताना बाईकवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर बाईकवरून आलेले दोघे हल्लेखोर फरार झाले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

नक्की घडलं काय?

आज सकाळी साडेसहा वाजता रणाजीत बच्चन लखनौमधील हजरगंज परिसरात मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. त्यानंतर ते ग्लोब पार्कमध्ये मित्रासोबत जात असताना बाईकवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्यासोबत असलेल्या दोघे जण देखील गंभीर जखमी झाले आहेत. तसंच रणजीत बच्चन यांच्या डोक्यात गोळी लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

माहिती मिळताच क्षणी पोलीस आयुक्त सुजित पांडे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तसंच आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रणजीत बच्चन यांचं पार्थिव पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.


हेही वाचा – ‘हिंदू-मुस्लिमांना जड जाणारा कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -