ईडीच्या छापेमारीनंतर विवोचे डायरेक्टर फरार, मनी लाँड्रिंग, टॅक्स चोरीप्रकरणी कारवाई

ईडीच्या छापेमारीनंतर विवोचे डायरेक्टर फरार, मनी लाँड्रिंग, टॅक्स चोरीप्रकरणी कारवाई

अंमलबजावणी संचालनालयाने चिनी मोबाईल कंपनी विवोविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. ईडीने ५ जुलै रोजी विवोच्या संबंधित कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरु केली असून देशातील विविध राज्यांमध्ये ४४ ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीनंतर आता कंपनीचे संचालक झेंगशेन ओऊ आणि झांग जी भारत सोडून फरार झाले आहेत.

ईडीने अलीकडेच विवो कंपनाविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीविरोधात कर चुकवेगिरी आणि रॉयल्टीच्या नावाखाली देशाबाहेर पैसे पाठवल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्येच या कंपनीची मालकी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चीनची बाजू या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय एजन्सीने जारी केलेल्या चिनी कंपन्यांविरोधातील तपासावर चीन संतापला.

5 जुलै रोजी चिनी मोबाईल निर्माता कंपनी विवोवर कारवाई केली. या कंपनी 44 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) करण्यात आली. या तपासानंतर असे समोर आले आहे की, मोबाईल उत्पादक कंपनी विवोशी संलग्न असलेल्या GPICL चे संचालक झेंगशेंग औ आणि झेंग जी यांनी गेल्या वर्षीच देश सोडून पलायन केले होते.

Xiomi वरही ईडीची कारवाई

ईडीने यापूर्वी एप्रिलमध्ये फेमा कायद्याच्या उल्लंघनामुळे चीनी मोबाईल कंपनी Xiomi वर कारवाई केली होती. या वेळी कंपनीची ५५५१ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली, कंपनीवर बेकायदेशीरपणे भारताबाहेर पैसे पाठवल्याचा आरोप आहे. कंपनीने फेब्रुवारी महिन्यात ही अफरतफर केली होती. त्यानंतर ईडीने मालमत्ता जप्तीची कारवाई केली. यावर ईडीने म्हटले की, टेक कंपनी चीनमधील मूळ कंपनीच्या सांगण्यावरून रॉयल्टीच्या नावाखाली एवढ्या मोठ्या रकमेचा गैरव्यवहार करत आहे. तसेच अमेरिकेतील Xiaomi ग्रुप कंपनीला नोटीस पाठवण्यात आली होती.

इतर चिनी कंपन्यांप्रमाणे विवो कंपनी देखील आयटी, ईडीच्या रडारवर आहेत. विवोच्या मालकी, आर्थिक अहवालांमधील तफावत जाणून घेण्यासाठी चौकशी करण्यात आली होती. याशिवाय ईडी, सीबीआय आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयही चिनी कंपन्यांवर नजर ठेवून आहे

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये आयकर विभागाने Huawei च्या कार्यालयांवर छापेमारी केली होती. यावेळी दिल्ली, हरियाणा, गुरुग्राम आणि बंगळुरू येथील कंपनीच्या कार्यालयांची झडती घेण्यात आली. कर चुकवेगिरीच्या आरोपाखआली आयकरने ही कारवाई केली होती.


…आणि उपमुख्यमंत्र्यांनी हाताला धरून मुख्यमंत्र्यांना खुर्चीत बसवले


First Published on: July 7, 2022 4:10 PM
Exit mobile version