उपमुख्यमंत्र्यांनी हाताला धरून मुख्यमंत्र्यांना खुर्चीत बसवले, शिंदेंचा कारभार सुरू

विशेष म्हणजे, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात आले होते

Eknath Shinde officially takes charge as Maharashtra CM at Mantralaya deputy cm Devendra Fadnavis present this moment

महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय सत्तांतरणानंतर अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. शिंदे घराण्यातला पहिला माणूस आज मुख्यमंत्री विराजमान होत असल्याने एकूणच आनंदाचे वातावरण होते. यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण शिंदे कुटुंबीय उपस्थित होते.

शिंदे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भव्यदिव्य कार्यालयात पूजा करण्यात आली. यावेळी संपूर्ण कार्यालय आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नव्या चेंबरमध्ये शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो लावण्यात आले असून त्याशेजारी शिंदे यांचे गुरू आनंद दिघे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही फोटो लावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेश करताच सर्वप्रथम त्यांनी मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंना पुष्पहार अर्पण करत वंदन केले. यानंतर ते मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले. यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. एकमेकांचे अभिनंदन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताला धरून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवले. यावेळी उपस्थितींनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीनेच पहिली स्वाक्षरी केली.

एकूणच खेळी मेळी आणि आनंदाच्या वातावरणात हा पदभार सोहळा पार पडला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळ खुर्ची घेऊन मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसले. काहीवेळ गप्पा, विनोद करत उपमुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदे यांना हस्तांदोलन करत सर्वांना पुन्हा नमस्कार केला. यावेळी शिंदे कुटुंबिय आणि शिंदे समर्थक आमदारांनी देखील उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून निरोप दिला.

शिंदे घराण्यातला पहिला माणूस आज मुख्यमंत्री विराजमान होत असल्याने एकूणच शिंदे कुटुंबात आणि समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी (गुरुवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर आज आठवड्याभरानंतर म्हणजेच ७ जुलै २०२२ रोजी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात त्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला.

विशेष म्हणजे, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात आले होते. मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सूनबाई वृषाली शिंदे आणि नातू सुद्धा आला होता. तसेच एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदारहीआज मंत्रालयात पोहोचले. आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर सकाळीच मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले.  एकूणच शिंदे कुटुंबियांसाठी हा एक मोठा दिवस होता. शिवसेनेचा एक छोटा कार्यकर्त्या, पालिकेचा गटनेता, आमदार, मंत्री आणि आता मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत प्रवास पाहणाऱ्या कुटुंबियांसाठी आयुष्यातील हा सर्वांत आनंदाचा क्षण होता.वशिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच कामाचा सपाटा सुरु केला. यावेळी उपस्थित सचिवांशी चर्चा करूनत त्यांनी सर्व घटकांनासोबत घेऊन गतिमान पद्धतीने कारभार करण्यावर भर द्यायचा आहे, अशी सूचनाही शिंदेंनी दिल्या.


आता ‘गद्दार’ कोण नंदिनी विचारे की, ठाण्यातील 66 माजी नगरसेवक?