सलाम ‘या’ मतदारांना! शंभरी पार करुनही बजावला मतदानाचा हक्क

सलाम ‘या’ मतदारांना! शंभरी पार करुनही बजावला मतदानाचा हक्क

सलाम 'या' मतदारांना! शंभरी पार करुनही बजावला मतदानाचा हक्क

आपलं मत हे अमूल्य असतं. आपल्या एका मतावरती देशाचं भवितव्य अवलंबून असंत. परंतु, याच मतदानाकडे आजचा तरुण वर्ग हवं तसं औत्सुक्यानं बघत नाही. परंतु, आसाममधील शंभरी पार केलेल्या वयोवृद्धी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या वयोवृद्ध मतदारांनी मतदान केंद्रात जाऊन मतदान केले आहे. त्यामुळे मतदानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरुणांच्या डोळ्यात आता झळझळीत अंजन भरलं गेलं असेल. या वयोवृद्ध मतदारांनी मतदान करुन देशातील नागरिकांमध्ये मतदानाची प्रेरणा दुप्पटीने जागृत केली आहे.

बीबी यांचा मतदानाचा हट्ट

सरगुना बीबी या १०४ वर्षांच्या आहेत. त्या आसामच्या हेलकंडी येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. बीबी यांचे चिरंजीव बद्रुद्दीन बारभुईया यांनी सांगितलं की, ‘दर निवडणुकीला त्या मतदानाला जातात. याशिवाय प्रत्येकाने मतदान करावं, असा त्यांचा हट्ट असतो. मी नेहमी त्यांना मतदान केंद्रावर घेऊन जातो.’ बीबी यांनी करीमगंज मतदारसंघासाठी मतदान केले आहे.

लोकशाहीमुळे आपण भुकेले नाहीत – अली

करीमगंजचे रहिवाशी मोहम्मद अली हे १६६ वर्षांचे आहेत. अली हे स्वातंत्र्य सेनानी आहेत. अली यांनी सांगितलं की, ‘मी दरवेळी मतदान करतो. मी देशातील सर्व तरुणांनी मतदान करावे, अशी विनंती करतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलेल्या आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात गरीबी होती. लोक भुकेले झोपायचे. आता मात्र परिस्थिती बरीच बदलली आहे. त्यामागे लोकशाही हेच कारण आहे. लोकशाहीमुळेच आपण बेरोजगार किंवा भुकेले नाहीत.’

First Published on: April 18, 2019 11:31 AM
Exit mobile version