Afghanistan crisis: काबुल एअरपोर्टवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अमेरिकेने नागरिकांना केले अलर्ट

Afghanistan crisis: काबुल एअरपोर्टवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अमेरिकेने नागरिकांना केले अलर्ट

Afghanistan crisis: काबुल एअरपोर्टवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अमेरिकेने नागरिकांना केले अलर्ट

तालिबानने अफगाणिस्तानवर ताब्या मिळवला असला तरी अजूनही संघर्ष मात्र सुरू आहे. यादरम्यान काही देश अफगाणिस्तानमधील असलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवत आहे. अशाच प्रकारची मोहीम अमेरिकेने देखील राबवली आहे. पण आता अमेरिकेने काबुल एअरपोर्टबाहेरील असलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिला आहे. काबुल एअरपोर्टवर अमेरिकन नागरिकांवर दहशतवादी हल्ला होण्याची भीती अमेरिकेला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानमधील असलेल्या आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे.

काबुल स्थित अमेरिकन दूतावास म्हणाले की, जो पण एअरपोर्टच्या एबे गेट, पूर्व गेट आणि उत्तर गेट जवळ आहे, त्यांनी ताबडतोब तिथून बाहेर पडा. यापूर्वी देखील अमेरिकेने एअरपोर्टवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान काबुल एअरपोर्टची सुरक्षा पूर्णपणे अमेरिकेच्या सैन्याने आपल्या हातात घेतली आहे. जेव्हा १५ ऑगस्टला तालिबानने काबुलवर कब्जा केला होता. त्यानंतर एअरपोर्टवर देश सोडून जाण्यासाठी नागरिकांची गर्दीच झाली होती. यामुळे रेस्क्यू करणाऱ्या विमानांना उतरण्यास आणि उड्डाण घेताना समस्यांचा सामना करावा लागला. या परिस्थितीमुळे काही काळासाठी एअरपोर्ट बंद ठेवण्यात आले होते.

अफगाणिस्तानमधील नागरिक देश सोडतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही जण अमेरिकेच्या हवाई दलातील विमान सी-१७ ग्लोबल मास्टरवर लँडिंग गिअर आणि इतर जागी लटकून जाताना पाहिले आहे. तसेच अमेरिकन विमान जेव्हा हवेत उडाले तेव्हा काही जण खाली पडल्याचे देखील पाहिले गेले आहे. यादरम्यान लोकांचा गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकन सैनिकांनी एअरपोर्टवर गोळीबार केला. पण आता अमेरिकेने या एअरपोर्टची सुरक्षा आपल्या हातात घेतली आहे. काबुल एअरपोर्टच्या बाहेर फक्त अमेरिकेचे नाहीतर तर दुसऱ्या देशातील देखील लोकं आहे.


हेही वाचा – तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर कोरोना लसीकरणात झाली ८० टक्के घट


First Published on: August 26, 2021 10:15 AM
Exit mobile version