झारखंडपाठोपाठ आता मध्य प्रदेशातही एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला ; तरुणीची प्रकृती चिंताजनक

झारखंडपाठोपाठ आता मध्य प्रदेशातही एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला ; तरुणीची प्रकृती चिंताजनक

खांडवा : मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात झारखंडसारखीच एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बांगर्डा गावातील एका २० वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका आदिवासी मुलीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने वार केले. ज्यात संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. आरोपी तरुणाचे नाव बबलू असून तो वॉचमनचं काम करतो. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधीत तरुणी तिच्या बहिणीसोबत घरात असताना आरोपी तरुणाने घरात घुसून तिच्यावर चाकू हल्ला केला. आरोपी तरुणाने संबंधित तरुणीला लग्नाची मागणी घातली होती, मात्र तरुणीने ती फेटाळून लावली. ज्या रागातून आरोपी तरुणाने तिच्यावर चाकू हल्ला केला.

या हल्ल्यात तरुणीच्या मानेवर आणि हाताला खोलवर गंभीर जखमा झाल्या आहेत. उपचारांसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी तरुण सध्या फरार असून त्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी आरोपी तरुणाच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर आरोपी त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर गावातील वॉचमन म्हणून नियुक्त करण्यात आले. दरम्यान खांडवा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विवेक सिंह यांच्या माहितीनुसार, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुनही संबंधित तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथक तयार करण्यात आली असून त्याचा शोध घेतला जात होता. अशात हल्ला करून फरार झालेल्या आरोपीचा मृतदेह सापडला आहे. इंदिरा सागर डॅम्पच्या बॅक वॉटरमध्ये आरोपीचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी बबलू हा पीडित तरुणीवर हल्ला करून फरार झाला होता.

दरम्यान झारखंडमध्येही अशाच प्रकारची एक घटना समोर आली होती. 23 ऑगस्ट रोजी दुमका येथे शाहरुख नावाच्या तरुणाने 12 वीत शिकणाऱ्या एका 19 वर्षीय मुलीवर एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळले होते. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.


हेही वाचा : कल्याणमध्ये शिवसेना पक्षनिष्ठेबाबत देखावा; पोलिसांकडून कारवाई करत सामग्री जप्त


 

First Published on: August 31, 2022 2:37 PM
Exit mobile version