Mumbai Local Train : हार्बर मार्गावरील लोकल पुन्हा रुळावरून घसरली; Wadala ते CSMT वाहतूक पूर्णपणे ठप्प

Mumbai Local Train : हार्बर मार्गावरील लोकल पुन्हा रुळावरून घसरली; Wadala ते CSMT वाहतूक पूर्णपणे ठप्प

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल घसरल्याची माहिती समोर येत आहे. 1 मे बुधवारी दुपारच्या सुमारास लोकल रुळावरून घरसल्याचे समजते. लोकल रुळावरून घसल्याने हार्बर मार्गावरील वडाळा ते सीएसएमटी स्थानकादरम्यानची वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून गर्दीचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी हार्बर रेल्वा मार्गावरील लोकल रुळावरून घसरली होती. परिणामी एकाच आठवड्यात दोन वेळा लोकल रुळावरून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Mumbai Local Train Local derailed near CSMT station Traffic from Wadala to CSMT completely stopped)

मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी स्थानकाजवळ रिकामी लोकल रुळावरून घसरली आहे. या रिकामी लोकलची चाचपणी सरु होती. चाचपणीदरम्यान ही लोकल रुळावरून घसरली. लोकल रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच तातडीने रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, शर्तीच्या प्रयत्नांनी लोकल रुळावर आणत वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहेत.

मागील दोन दिवसांत दुसऱ्यांदा हार्बर रेल्वे मार्गावर लोकल रुळावरून घसरली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवार 29 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील पनवेल लोकलचा एक डबा सीएसएमटी ते वडाळा स्थानकादरम्यान रुळावरून घसरला होता. त्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळी हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान दोन्ही बाजूने बंद करण्यात आली होती. मात्र जवळपास अडीच तासांनी बंद झालेली वाहतूक सुरळीत करण्यात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना यश आले होते.


हेही वाचा  – Harbour Railway : हार्बर मार्गावरील वाहतूक जवळपास अडीच तासांनी सुरळीत

First Published on: May 1, 2024 5:09 PM
Exit mobile version