चेन्नईत जलसंकट; अखेर चेन्नईकरांची आज भागणार तहान

चेन्नईत जलसंकट; अखेर चेन्नईकरांची आज भागणार तहान

चेन्नईत जलसंकट; अखेर चेन्नईकरांची आज भागणार तहान

देशात काही भागांमध्ये प्रचंड पाऊस पडत आहे तर काही भागांमध्ये पाणीटंचाई आहे. चेन्नईकरांना सध्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दरम्यान, चेन्नईकरांची तात्पुरता तहान भागविण्यासाठी तमिळनाडू सरकारने वेल्लोरच्या जोनलपेट येथून रेल्वे मार्गाने तमिळनाडूत पाणी आणण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत रेल्वे मार्फत २५ लाख लीटर पाणी चेन्नईत दाखल होणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली आहे.

पावसाळ्या अगोदर ६५ कोटींचे पाणी आणणार – मुख्यमंत्री

दरम्यान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी पावसाळा सुरु होण्याअगोदर ६५ कोटी रुपयांचे पाणी वेल्लूर येथून मागवले जाणार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे डीएमके नेता एंम. के. स्टालिनने स्वागत केले आहे. यासाठी चेन्नईने दरदिवशी १० लाख लीटर पाण्याचे लक्ष्य ठेवले आहे.


हेही वाचा – ममता बॅनर्जींचे आमदार ‘माफी यात्रा’ काढणार

First Published on: July 12, 2019 1:04 PM
Exit mobile version