घरदेश-विदेशममता बॅनर्जींचे आमदार 'माफी यात्रा' काढणार

ममता बॅनर्जींचे आमदार ‘माफी यात्रा’ काढणार

Subscribe

पश्चिम बांगालमध्ये भाजपच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस 'माफी यात्रा' काढणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून ममता बॅनर्जींचे आमदार सर्वसामान्य जनतेशी संवाद साधणार आहेत आणि चुका विचारुन त्यांची माफी मागणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा वाढता प्रभाव हा तृणमूल काँग्रेसच्या डोकेदुखी ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वाढलेला जागांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. २०२१ साली पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या दोन वर्षांअगोदरच ममता बॅनर्जींना भाजपची धास्ती भरली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींनी आपल्या आमदारांना २०२१ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘माफी यात्रा’ काढण्याचे आदेश दिले आहेत.

कास असणार माफी यात्रेत?

ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी माफी यात्रेचे आदेश दिले आहेत. याशिवाय जे पक्षापासून दुरावले आहेत, त्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न करावेत, असेही ममतांनी आमदारांना सांगितले आहे. ममतांनी सांगितल्याप्रमाणे तृणमूलचे सर्व आमदार राज्यभर माफी यात्रा काढणार आहेत. या यात्रेत ते सामान्य नागरिकांना भेटणार आहेत. त्यांना आपल्या चुका विचारणार आहेत आणि त्यांची माफी मागणार आहेत. या यात्रेत कुणी समोरुन चुका सांगितल्या तर आमदार सर्वांसमोर त्यांची माफी मागणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर दोन आठवड्यानंतर सुनावणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -