Weather Update : उकाड्यापासून सुटका नाहीच; दिल्लीसह ‘या’ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

Weather Update : उकाड्यापासून सुटका नाहीच; दिल्लीसह ‘या’ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या कडक उन्हाचा सामना करावा लागतोय. गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे गुजरात, बिहार, झारखंड, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहू शकते. दिल्ली एनसीआरमध्ये आज आकाश निरभ्र राहील. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज किमान तापमान 24 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

28 एप्रिलपासून दिल्लीत पुन्हा उष्णतेची लाट येईल आणि कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात तीन वेळा सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता होती, परंतु ढगांच्या अनुपस्थितीमुळे ती पूर्ण झाली नाही. आता हवामान खात्याने हिमाचलमध्ये 28 एप्रिलपासून सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्सची शक्यता व्यक्त केली आहे. कोरड्या हंगामात उत्तराखंडमध्ये कडक उन्हामुळे त्रास होत आहे. हवामान केंद्राच्या म्हणण्यानुसार, सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे मंगळवारी डोंगराळ भागात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.

स्कायमेट हवामानानुसार, आज गुजरात, बिहार, उत्तर मध्य महाराष्ट्र, झारखंड, अंतर्गत ओडिशा, राजस्थान आणि दक्षिण उत्तर प्रदेशच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

स्कायमेट वेदरनुसार, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ईशान्य भारत, सिक्कीम, केरळ, दक्षिण किनारपट्टी कर्नाटक आणि अंतर्गत तमिळनाडूच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांवर, आंध्र प्रदेशचा उत्तर किनारा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम हिमालयात एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


Elon Musk यांच्या हाती Twitter चा कंट्रोल! सोर्स कोड होणार पब्लिक; होणार ‘हे’ 5 मोठे बदल

First Published on: April 26, 2022 10:57 AM
Exit mobile version