घरटेक-वेकElon Musk यांच्या हाती Twitter चा कंट्रोल! सोर्स कोड होणार पब्लिक; होणार...

Elon Musk यांच्या हाती Twitter चा कंट्रोल! सोर्स कोड होणार पब्लिक; होणार ‘हे’ 5 मोठे बदल

Subscribe

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क आता ट्विटर कंपनीचे मालक बनत आहेत. मस्क यांनी 44 अब्ज डॉलर किंमतीला जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला खरेदी केले आहे. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आता अब्जावधी युजर्स असलेल्या ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंट्रोल ठेवणार आहे. मस्क यांचा ट्विटर खरेदीचा करण्याचा करार यावर्षी पूर्ण होणार आहे.

एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर कंपनीमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. आत्तापर्यंत ट्विटर अनेक भागधारकांसह एक सार्वजनिक कंपनी होती. मात्र यावर मस्क म्हणाले की, ट्विटरमध्ये अनेक सुधारणा करण्यासाठी ही कंपनी खाजगी करावी लागेल.करार पूर्ण होताच ट्विटर एक खाजगी कंपनी म्हणून युजर्ससमोर येणार आहे. तसेच यात अनेक मोठे बदल दिसतील. मात्र या बदलांमधील ५ मोठे बदल आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

- Advertisement -

एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यामागचे कारण आपल्या फ्री स्पीचमध्ये सांगितले आहे. एलन मस्क म्हणाले होते की, ट्विटरमध्ये भरपूर पोटँशिअल आहे, पण त्यासाठी कंपनीला खाजगी करावे लागेल. आता मस्क यांनी कंपनी विकत घेतल्याने येत्या काळात त्यांनी जी काही आश्वासने दिली आहेत ती लवकरच पूर्ण होताना दिसू लागतील. यात पहिला बदल म्हणजे कंटेंट मॉडरेशनमध्ये बदल केले जातील आणि सेन्सॉरशिपबाबतही मोठी पावले उचलली जातील.

Twitter चे अल्गोरिदम ओपन सोर्स होतील

एलन मस्क यांचे मत आहे की, फ्री स्पीचसाठी ट्विटरचे अल्गोरिदम ओपन सोर्स करावे लागेल. आता त्यांनी कंपनीच विकत घेतली आहे तर ते लवकरच ट्विटरचे अल्गोरिदम ओपन सोर्स करण्याची शक्यता आहे. ट्विटरचे अल्गोरिदम ओपन सोर्स केल्यास युदर्सचा ट्विटरवर विश्वास निर्माण होईल. असं त्यांचं मत आहे.

- Advertisement -

अलीकडच्या एका मुलाखतीदरम्यान, एलन मस्क म्हणाले की, ट्विटर युजर्संना हे जाणून घेण्याचा अधिकार असला पाहिजे की, त्यांचे ट्विट अकाऊंट डिमोट केले जातेय किंवा प्रोमोट केले जात आहे. तसेच ते कोणत्या आधारावर काय केले जात आहे याचीही माहिती युजर्सना मिळायला हवी. ट्विटरचा कोड github वर उपलब्ध असावा जेणेकरून कोणीही त्यात बदल करण्यासाठी सजेस्शन देऊ शकेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

अल्गोरिदम ओपन सोर्स झाल्या ट्विटरमधील ट्रान्सपरन्सी अधिक वाढेल आणि इंडिपेंडेंट सिक्युरिटी रिसर्चर वेळोवेळी त्याची टेस्ट करू शकतील. एकूणच ट्विटरच्या सिक्युरिटीपासून ट्रान्सपरन्सीमध्ये सुधारणा होईल.

ट्विटर विकत घेण्यापूर्वी मस्क म्हणाले होते की, ट्विटर विकत घेतल्यानंतर ते प्लॅटफॉर्मच्या सर्व युजर्सला ऑथेंटिकेट करतील. म्हणजेच ट्विटरवरील सर्व युजर्स वास्तविक असतील. सध्या ट्विटरवर फेक अकाऊंट्स आणि बॉट्सचा खच आहे.

ट्विटरच्या खरेदीची घोषणा केल्यानंतर मस्कने पुन्हा म्हटले आहे की, ते ट्विटरवरील सर्व युजर्सला ऑथेन्टिकेट करतील आणि स्पॅम बॉट्स काढून टाकतील.मात्र त्यांनी दिलेले आश्वासन कसे पूर्ण होईल, हे सांगता येत नाही.

कारण इंटरनेटवरून फेक युजर्स आणि बॉब अकाऊंट काढून टाकणे अशक्य असल्याचे बहुतांश सोशल मीडिया आणि प्रायव्हसी तज्ज्ञांचे मत आहे.

स्पॅम बॉट अकाऊंट्स होणार बॅन

एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर या प्लॅटफॉर्मवरून बॉट अकाऊंट्स बॅन केले जातील, असे आश्वासनही दिले आहे. बॉट अकाऊंट काढण्यासाठी ते जीवाची बाजी लावू शकतात असेही त्यांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे आता मस्क ट्विटरवरून बॉट अकाऊंट कसे हटवतात हे पाहणे मनोरंजक असेल.

फॉलोअर्सची संख्या झपाट्याने होणार कमी

जर सर्व युजर्स ऑथेन्टिकेट झाले आणि बॉट अकाऊंट्स योग्य प्रकारे ट्विटरवरून काढून टाकली गेली तर युजर्सच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी घट होईल.

सध्या ट्विटर हे बॉट अकाऊंट्स आणि फेक अकाऊंट्सने भरलेले आहे. यातजास्त फॉलोअर्स असलेले अकाऊंट हे एकतर बनावट किंवा बॉट्स अकाऊंटने भरलेले आहे. बॉट अकाउंट काढून टाकताच युजर्सच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने कमी होईल.


Twitter-Elon Musk Deal: एलन मस्क दोन पाऊल पुढे, ३२७३ अब्ज रुपयांना खरेदी करू शकतात ट्विटर, जाणून घ्या

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -