Delhi Weekend Curfew: दिल्लीत वीकेंड लॉकडाऊनची घोषणा, उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Delhi Weekend Curfew: दिल्लीत वीकेंड लॉकडाऊनची घोषणा, उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

संपूर्ण जगभरासह देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. कोविडच्या नव्या व्हेरियंटने सुद्धा जगभरात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीत वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पहिल्यापासूनच यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच काही गोष्टींवर बंदी सुद्धा लावण्यात आली होती. दिल्ली मॅनेजमेंट अथॉरिटीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दिल्लीमध्ये कोविड-१९ च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वीकेंड कर्फ्यू लावण्यात आल्याचं डीडीएमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच दिल्लीमध्ये आवश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सरकारी अधिकाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचसोबतच खासगी संस्थांमधून ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सांगण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अधिक सर्तकता बाळगता यावी, यासाठी कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितलं की, मेट्रो स्थानकाबाहेर आणि बस स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी हा वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. DDMA च्या बैठकीत कोरोनावर नियंत्रित करण्यासाठी वीकेंड कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये शनिवार आणि रविवारी कर्फ्यू लावण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावं लागणार आहे.

ओमिक्रॉनची रूग्णसंख्या वेगाने वाढत आहे. राज्यात मागील ८ ते १० दिवसांपासून ११ हजार इतक्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास ३५० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १२४ रूग्ण ऑक्सिजन आणि ७ रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोना रूग्णसंख्येत दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर

मागील २४ तासांत दिल्लीत कोरोना रूग्णांचे ४ हजार ९९ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तसेच संक्रमणाची टक्केवारी ६.४६ टक्के इतकी आहे. संपूर्ण देशातून कोरोना रूग्णांची सर्वाधिक आकडेवारी पाहिली असता दिल्ली तिसऱ्या क्रमाकांवर आहे. आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत कोरोना रूग्णांपेक्षा ओमिक्रॉनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.


हेही वाचा : Katrina लग्नानंतर हॉट अवतारात, ओव्हर साइज स्वेटर अन् मंगळसूत्राने वेधले लक्ष


 

First Published on: January 4, 2022 4:21 PM
Exit mobile version