दोन मुलांच्या आईने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, यासाठी घेतला होता पतीपासून घटस्फोट

समलैंगिकांच्या हक्कांबाबत सध्या देशात चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत कोलकातामध्ये समलैंगिक विवाह पाहायला मिळत आहे. येथे एका मंदिरात दोन मुलींचे पारंपरिक पद्धतीने लग्न झाले. मौसमी दत्ता आणि मौमिता मजुमदार यांनी रविवारी मध्यरात्री भूतनाथ मंदिरात लग्न करत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी शेअर केली आहे. (west bengal Kolkata same sex marriage divorce from husband and then the girl married the girl photos viral on social media )

या जोडप्याने मीडियाला सांगितले की, मौसमी दत्ता आधीच विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. दत्ता सांगते की, तिचा नवरा तिला रोज मारहाण करायचा, त्यामुळे ती पतीपासून वेगळी झाली. ती म्हणाली मला दोन मुलं असून त्यांची जबाबदारी माझी आहे. या जोडप्याने सांगितले की ते दोघे (मौसमी दत्ता आणि मौमिता मजुमदार ) सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. नंतर जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मजुमदार हिने तिच्या जोडीदाराच्या (दत्ताच्या) मुलांचा स्वेच्छेने स्वीकार केला.

सध्या या दोघीही उत्तर कोलकाता येथे भाड्याच्या घरात राहत असून समलिंगी विवाहाबाबतच्या घडामोडींची त्यांना माहिती आहे. सुप्रीम कोर्टाकडून अनुकूल निकालाची अपेक्षा करत दत्ता म्हणाली की, निकाल काहीही लागो, मी नेहमीच माझी मैत्रिण मुजूमदार हिच्यासोबत असेन.

( हेही वाचा: खाजगी नोकरदारांच्या Leave Encashment बाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय )

कोणतेही नियम आम्हाला एकत्र राहण्यापासून रोखू शकत नाहीत, असं या दोघींनी म्हटलं आहे. समलिंगी विवाहाच्या प्रमाणपत्राला न्यायालय परवानगी देत ​​नसलं तरी कोणताही नियम त्यांना एकत्र राहण्यापासून रोखत नाही, असा दावा या दोघींनी केला आहे. याआधीही कोलकात्यात असे अनेक विवाह झाले आहेत. वर्षानुवर्षे एकत्र आनंदाने राहणारे सुचंद्र आणि श्री दोघेही आता शहरातील LGBTQ हक्क चळवळीचे लोकप्रिय चेहरे आहेत.

First Published on: May 26, 2023 1:40 PM
Exit mobile version