कोरोनाबाबत पसरवली अफवा; भाजपच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल

कोरोनाबाबत पसरवली अफवा; भाजपच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल

पश्चिम बंगाल पोलिसांनी गुरुवारी भाजपचे खासदार सुभाष सरकार यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्यांच्यावर सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अफवा पसरवल्याचा आरोप आहे. बांकुरा येथील खासदार सुभाष सरकार यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर बंकुरा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली. तृणमूल कॉंग्रेसचे (टीएमसी) नेते जयदीप चट्टोपाध्याय यांनी तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांकडून दोन्ही मृतदेहांचा अंत्यसंस्कार करण्यात चूक झाली असल्याचे भाजप खासदारांनी सोशल मीडियावर म्हटलं. या दोघांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.


हेही वाचा – मरकजचे प्रमुख मौलाना सादवर ईडीने केला गुन्हा दाखल

“खासदार स्वत: डॉक्टर आहेत. दुर्दैवाची बाब आहे की कोणताही अहवाल न पाहता सर्व देशभर कोरोनाचं संकटाच्या वेळी त्यांनी सोशल मीडियावरून अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला,” असा आरोप तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, या आरोपावर प्रत्युत्तर देताना भाजपचे खासदार यांनी, “चाचणी अहवाल येण्यापूर्वी प्रशासनाने मृतदेहांचे अंत्यसंस्कार कसे केले?” असा सवाल केला आहे. १२ एप्रिलला मध्यरात्री अधिकाऱ्यांनी सरकारी रुग्णालयात दोन जणांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. काही लोकांनी दावा केला आहे की त्या दोघांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला होता.

 

First Published on: April 17, 2020 11:22 AM
Exit mobile version