खुशखबर! ‘या’ राज्यात होणार ३२ हजार शिक्षकांच्या पदांसाठी भरती; वाचा सविस्तर

खुशखबर! ‘या’ राज्यात होणार ३२ हजार शिक्षकांच्या पदांसाठी भरती; वाचा सविस्तर

प्रातिनिधीक फोटो

पश्चिम बंगाल सरकारने पुढच्या वर्षी मार्चपर्यंत उच्च प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावरील ३२ हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असे सांगितले, प्राथमिक स्तरावर (इयत्ता १ ली ते ४ थी) किमान १० हजार ५०० रिक्त जागा आणि उच्च प्राथमिक स्तरावर (इयत्ता १ ली ते ५वी ) १४ हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. साधारण यावर्षी ऑक्टोबरपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

यानंतर भरतीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांवर भरतीसाठी अर्ज करू शकतील. शिक्षकांच्या निवड प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनीही या प्रक्रियेतील जबाबदार व्यक्तींना इशारा दिला आहे. यावेळी ममता बॅनर्जी असेही म्हणाल्या, आतापर्यंत या पदांची भरती उच्च न्यायालयात प्रकरणांमुळे अडकल्या होत्या. पण आता मार्ग मोकळा झाला आहे.

कलकत्ता उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात इच्छुक उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांनंतर भरती प्रक्रियेवर अंतरिम स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. या याचिकेत, उमेदवारांनी पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाने जारी केलेल्या गुणवत्ता यादीमध्ये विसंगती असल्याचा आरोप देखील केला होता. यासह या प्रकरणातील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सेंट्रल स्कूल सर्व्हिस कमिशनला (WBCSSC) ही विसंगती सुधारण्याचे आदेश दिले. त्याच बरोबर असेही सांगण्यात आले की भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांना वगळता कामा नये याची खबरदारी घेतली गेली पाहिजे.


राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवस!

 

First Published on: June 22, 2021 4:16 PM
Exit mobile version