मतदारांना घाबरवण्यासाठी समाजकंटकांनी फेकले देशी बॉम्ब

मतदारांना घाबरवण्यासाठी समाजकंटकांनी फेकले देशी बॉम्ब

मतदारांना घाबरवण्यासाठी समाजकंटकांनी फेकले देशी बॉम्ब

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. सकाळ पासून राज्यातील सगळ्याच मतदान केंद्रावर सुरळीतपणे कार्य सुरु आहे. परंतु, सकाळी १० वाजेपासून पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये परिस्थिती बिघडली आहे. काही समाजकंटकांनी लोकांना घाबरवण्यासाठी मतदान बूथ जवळ देशी बॉम्ब फेकले आहेत. राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असूनही मतदान प्रक्रियेत बाधा आणण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत.

‘या’ बूथ क्रमांकावर बॉम्ब हल्ला

सर्वात अगोदर मुर्शिबाद येथील डोकलाम परिसरात हिंसा झाली. यामध्ये दोन गटात मोठी हाणामारी झाली. या हाणामारीत तृणमूल काँग्रेसचे ३ कार्यकर्ते जखमी झाले. यानंतर रानीनगर येथील बूथ क्रमांक ४७ आणि ४८ जवळ काही समाजकंटकांनी बॉम्ब फेकले. हे बॉम्ब फेकल्यानंतर पळून गेले. मतदारांना घाबरवणे हाच त्याचा त्यामागील हेतू होता. दरम्यान बॉम्ब फेकणारे समाजकंटकांचा कुठल्या पार्टीशी संबंध आहे का, यासंबंधीची माहिती अजून समोर आलेली नाही. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच बूथवर सुरक्षा व्यस्था वाढवण्यात आली आहे. रानीनगर व्यतीरिक्त मालदा विभागातही बॉम्ब बूथजवळ बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली आहे. मालदा येथे २१६ क्रमांकाचे बूथवर या समाजकंटकांनी लक्ष्य केलं होतं.

दुपारी १ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान

मतदान बूथवर हल्ला होत असला तरी त्याचा मतदानावर फार काही परिणाम झालेला दिसला नाही. उलट दुपारी एक वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेने सर्वाधिक मतदान झाले आहे. दुपारी १ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ५२.३७ टक्के मतदान झाले आहे.

First Published on: April 23, 2019 3:42 PM
Exit mobile version