गाढवीणीच्या दुधात कोणकोणती व्हिटॅमिन्स ? जगातले महागडे चीजही गाढवीणीच्याच दुधाचे

गाढवीणीच्या दुधात कोणकोणती व्हिटॅमिन्स ? जगातले महागडे चीजही गाढवीणीच्याच दुधाचे

कोरोनामध्ये जसजसी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज समोर येऊ लागली, तसतशा अनेक गोष्टींची चर्चा ही रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या निमित्ताने होऊ लागली. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे गाढवीणीच दुध. पेशी बऱ्या करण्याचे आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सर्वात महत्वाचा असा गुणधर्म हा गाढवीणीच्या दुधात आहे. तुलनेने चरबीचे प्रमाण कमी असल्यानेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या दुधाचा वापर करा असा सल्ला देण्यात येतो. खुद्द संयुक्त राष्ट्र्रामार्फतही या दुधाची उपयुक्तता स्पष्ट करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या माहितीनुसार गाढवणीच्या दुधात औषधी घटक असल्यानेच याचा उपयोग औषध उद्योगात होतो आणि सौंदर्य प्रसाधन निर्मितीमध्येही याचा उपयोग करण्यात येतो. जवळपास ५ हजार रूपये प्रति लिटर इतक्या दराने हे गाढवीणीचे दूध विकले जाते. अनेक देशांमध्ये गाढवीणीच्या दुधाचा व्यवसायही आता सुरू झाला आहे. तर अनेक देशांमध्ये संशोधनाच्या माध्यमातून गाढवणीचे संगोपन करण्यासाठीचा पुढाकारही घेण्यात आला आहे.

गाढवीणीच्या दुधात कोणकोणत्या व्हिटॅमिन्सचा समावेश ?

एका अहवालाचा आधार घेत बीबीसीने एक वृत्त दिले आहे, ज्यामध्ये गाढवणीचे दूध हे प्रोटीनयुक्त असे आहे. त्यामध्ये मानवी दुधासारखेच गुणधर्म आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे पेशी बरे करण्यासाठीही हे दूध उपयुक्त आहे. तर रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या दुधाला महत्व आहे. या गाढवीणीच्या दुधामध्ये प्रामुख्याने लॅक्टोज, व्हिटॅमिन ए, बी -१, बी-२, बी-६, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई देखील यासारखे गुणधर्मही आहेत. त्यामुळेच हे दूध मोठ्या प्रमाणात शरीराला उपयुक्त ठरते. भारतात प्रामुख्याने गुजरातमध्ये हलेरी जातीच्या गाढवांचा पालन पोषण केले जाते. त्यामुळे या जातीच्या गाढवांना मागणी आहे. भारतातही गाढवांच्या वेगवेगळ्या जातींवर संशोधन सुरू आहे. प्रामुख्याने गाढवीणीच्या दुधाचा गुणधर्म पाहता आता परदेशांप्रमाणेच भारतातही गाढवांच्या पालन पोषणाकडे महत्व देण्यात येत आहे. विशेष म्हणजे गाढवाचे संशोधनासाठीचे महत्व पाहता, गाढवाच्या पालनाचा ट्रेंड आता भारतातही सुरू झाला आहे. सौंदर्य प्रसाधनांच्या क्षेत्रात तसेच वैद्यकीय क्षेत्रातही गाढवांची उपयुक्तता पाहता अमेरिका आणि युरोपसारख्या देशात गाढवाचे चांगले संगोपन केले जाते. तसेच अनेक देशांमध्ये गाढवाच्या दुधाचाही व्यवसाय सुरू झाला आहे. ऑनलाईनदेखील गाढवाच्या दुधापासूनचे मार्केट मोठे आहे. त्यामध्ये साबण, बॉडीवॉश, बॉडी लोशन अशा अनेक गोष्टींमध्ये या दुधाचा वापर करण्यात येतो.

जगातले सर्वात महागडी चीज निर्मिती गाढवीणीच्या दुधापासूनची

एक किलो चीज जर खरेदी करायचे असेल तर सर्वाधिक अशी ६०० डॉलर्स इतकी किंमत या चीज खरेदीसाठी तुम्हाला मोजावी लागेल. देशात एकाच देशात आणि एकाच कंपनीत हे चीज तयार होते ते म्हणजे सर्बिया येथे. अतिशय क्लिष्ट आणि वेळखाऊ अशी ही चीजनिर्मितीची प्रक्रिया आहे. एक किलो चीज तयार करण्यासाठी तब्बल ६.६ गॅलन्स गाढवाचे दूध आवश्यक असते. या चीजमध्ये गाढवाचे दूध ६० टक्के तर बकरीचे दूध ४० टक्के इतके असते. गाढवांची धोक्यात आलेल्या बाल्कन ही प्रजाती वाचवण्यासाठी ही चीज निर्मितीची शक्कल लढवण्यात आली. आता हीच कल्पना मोठ्या प्रमाणात उत्पन्न देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.


 

First Published on: April 30, 2021 10:44 AM
Exit mobile version