नार्को टेस्ट म्हणजे काय?, ज्यामुळे गुन्हेगार खरे बोलू लागतात

नार्को टेस्ट म्हणजे काय?, ज्यामुळे गुन्हेगार खरे बोलू लागतात

दिल्लीतील श्रद्धा मर्डर प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताबच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 5 दिवसांची वाढ केलीय. विशेष म्हणजे आफताबची नार्को टेस्ट करण्यासही कोर्टाने परवानगी दिली आहे. नार्को टेस्टमध्ये मोठमोठे गुन्हेगार सत्य उघड करतात. म्हणून गुन्हेगारांमध्ये नार्को टेस्टची एक वेगळीच भीती असते. नार्को टेस्ट कशी केली जाते आणि त्यात गुन्हेगार कसा सत्य बोलू लागतो.

कोर्टाने आफताबच्या नार्को चाचणीला परवानगी दिली
श्रद्धाच्या हत्येचा आरोपी आफताबच्या नार्को टेस्टला कोर्टाने परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणाचीही नार्को टेस्ट करता येत नाही. पोलिसांनी असे केले तर तो गुन्हा ठरू शकतो. नार्को चाचणीसाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी नार्को टेस्टसाठी न्यायालयाची परवानगी आवश्यकच असते.

नार्को चाचणी कोण करते?
नार्को टेस्ट फक्त तज्ज्ञ टीमच करू शकते. या टीममध्ये डॉक्टर, फॉरेन्सिक तज्ज्ञ, तपास अधिकारी, मानसशास्त्रज्ञ आणि पोलिसांचा समावेश असतो. नार्को चाचणीसाठी प्रथम तज्ज्ञांची टीम तयार करण्यात येते. त्यानंतर ही टीमच पूर्ण नार्को टेस्टची प्रक्रिया पार पाडते.

नार्को टेस्ट कशी केली जाते?
विशेष म्हणजे नार्को टेस्टमध्ये गुन्हेगाराला एक औषध दिले जाते, त्यामुळे तो खरे बोलू लागतो. इंजेक्शनद्वारे सत्य बोलण्याचे औषध दिले जाते. सत्य बोलण्याच्या औषधामुळे माणूस अर्धा बेशुद्धावस्थेत जातो. मग अर्ध्या बेशुद्धीच्या अवस्थेत माणूस खोटं बोलू शकत नाही. नार्को चाचणीसाठी मशिनचाही वापर केला जातो. हे एखाद्या व्यक्तीच्या बोटांवर लावले जाते. या मशीनच्या मदतीने माणसाच्या सर्व हालचालींवरही लक्ष ठेवले जाते. आरोपी आफताबच्या नार्को टेस्टमध्ये श्रद्धा खून प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.


हेही वाचाः गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी शेगावात घेणार जाहीर सभा, मनसेकडून निषेध

First Published on: November 18, 2022 10:54 AM
Exit mobile version