Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यानंतर काय करावे, काय टाळावे?

Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यानंतर काय करावे, काय टाळावे?

लसीकरणात कोणते जिल्हे आघाडीवर आणि कोणते पिछाडीवर? जाणून घ्या

देशात सुरुवातीपासून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २०२० हे कोरोना महामारीत गेले असेल तरी २०२१ मध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सरकारने राबवली आहे. १६ जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली आहे. आज आपण कोरोना लस घेतल्यानंतर काय करायचे आहे आणि काय टाळायचे आहे?, ते पाहणार आहोत.

कोरोना लस घेतल्यानंतरही तुम्हाला मास्क घालायचे असून सर्व प्रकारची काळजी घ्यावी लागणार आहे, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. याबाबत वैज्ञानिकांनी अनेक कारणे सांगितली आहेत. एक म्हणजे, कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित नाही आहे. अजूनपर्यंत आपल्याला माहित नाही आहे की, लस दिल्यानंतरही लोकं संसर्ग पसरवू शकतात की नाही? दरम्यान जोपर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांना लस दिली जात नाही, तोपर्यंत कोरोना संसर्ग पसरत राहिल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. म्हणजेच हर्ड इम्यूनिटी तयार होण्यास अधिक वेळ लागू शकतो.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे न्युरोइकोनॉमिस्ट उमा करमाकरने न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, ‘लोकांनी पूर्वीप्रमाणे जीवन जगण्यासाठी घाई केली नाही पाहिजे. लस दिल्यानंतर हळूहळू बदल होतील, परंतु काही बदलांना वेळ लागेल.’

माहितीनुसार, अमेरिकेत लस दिल्यानंतर कोरोना संसर्गाचा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की, लोकसंख्येचा एक भाग लस घेतल्यानंतरही आजारी पडू शकतो. जेव्हा कोरोना महामारी पूर्ण जगात पसरली आहे. लहान प्रमाणातील संक्रमण देखील मोठ्या आकड्यामध्ये बदलू शकते.

लस घेतल्यानंतर किती धोका आहे?

जर तुम्हाला दोन्ही लसीचे डोस दिले असतील आणि इतर कोणाला दिले नसतील, तर यामुळे आयुष्यात जास्त मोठा बदल होणार नाही आहे, असे वैज्ञानिक म्हणतात. तसेच लस घेतल्यानंतर ग्रॉसरी स्टोअर आणि बँकमध्ये जाणे हे पहिल्याच्या तुलनेत खूप सुरक्षित असेल. विशेष म्हणजे, जे लोकं अधिक बाधित क्षेत्रात काम करत आहेत, त्यांच्यासाठी धोका कमी होईल. यामुळे भारतात पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिली जात आहे. परंतु लस दिल्यानंतरही तुम्हाला मास्क लावायचा आहे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायचे आहे. हे तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षितेसाठी खूप महत्त्वाचे आहे.

नॅशविले के वॅन्डबिल्ट मेडिकल सेंटरमधील महामारी तज्ज्ञ डॉ. विलियम स्केफनर यांनी सांगितले की, ‘लस घेतल्यानंतरही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते आणि दुसऱ्यांमध्ये संसर्ग पसरवू शकता.’ जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीमध्ये सिनिअर स्कॉलर डॉ. अमेश अदालजा यांनी सांगितले की, ‘लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही अशी हमी देऊ शकत नाही की, कोरोनापासून वाचू शकता आणि दुसऱ्यांमध्ये कोरोना पसरवू शकत नाही. त्यामुळे लस दिल्यानंतर खूप सावधानगिरी बाळगने गरजेचे आहे.’

पुढे अदालज म्हणाले की, ‘जर तुम्ही कोणाला गळाभेट करणाऱ्या त्या व्यक्तीने लस घेतली नाही आहे आणि समजा त्याला मधुमेह आहे आणि त्याचे वय ६० वर्षांहून अधिक आहेत, तर त्यांच्यामध्ये संसर्ग पसरू शकतो. ते गंभीर स्वरुपात आजारी पडू शकतात. जर वृद्धांना लस दिली तर दिलासादायक बाब असेल. कारण कोरोना व्हायरस सर्वाधिक धोका वृद्धांना आहे.’

जर तुमच्या संपूर्ण कुटुंबाने आणि सर्व मित्रांनी लस घेतली असेल तर तुम्ही त्यासोबत राहू शकता. पण तुमचा आजूबाजूच्या लोकांबद्दल हे माहित नसेल तर त्यासोबत फिरणे जोखमीचे असेल.


हेही वाचा –  कोरोना लसीबाबत बऱ्याच अफवा, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका!


 

First Published on: January 18, 2021 12:48 PM
Exit mobile version