नवीन संसदेच्या उद्घाटनानंतर जुने संसद भवन जमीनदोस्त होणार काय?

नवीन संसदेच्या उद्घाटनानंतर जुने संसद भवन जमीनदोस्त होणार काय?

Union Cabinet Approves Women's Reservation Bill

देशाचं नवं संसद भवन जवळपास अडीच वर्षांत तयार झालं आहे. २८ मे रोजी सेंट्रल व्हिस्टा अर्थात नवीन संसदेचं उद्घघाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेचं उद्घघाटन करणार आहेत. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख आहेत, त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेचे उद्घाटन झालं पाहिजे, अशी भावना विरोधकांनी व्यक्त केली आहे. त्यातच आता असाही प्रश्न निर्माण होत आहे की नवीन संसद तयार झाल्यानंतर आता जुन्या संसद भवनाचं काय होणार?

काय होणार जुन्या संसद भवनाचं?
केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मार्च २०२१ मध्ये राज्यसभेत सांगितलं होतं की, नवीन संसदेची इमारत तयार झाल्यानंतर सध्याच्या गोलाकार संसदची दुरीस्ती केली जाणार आहे. त्यासोबतच त्यांनी जुन्या इमारतीचा पर्यायी व्यवस्था म्हणूनही वापर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र त्यांनी जुन्या संसदेचं काय करणार यावर काहीही ठोस विचार केला नसल्याचंही मंत्री महोदयांनी स्पष्ट केलं.

नवीन संसदेची निर्मिती आणि सध्याच्या संसदेची दुरुस्ती देखभाल हा ‘सेंट्रल व्हिस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट’चा भाग आहे. या प्रोजेक्टसंबंधीच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, सेंट्रल व्हिस्टा मधील इंडिया गेट, संसद, नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक, नॅशनल अर्काईव्ह या पैकी कोणतीही इमारत जमीनदोस्त होणार नाही.

यात म्हटले आहे की या इमारतींना अपग्रेड करण्याची गरज आहे. या इमारती म्हणजे देशाची वारसास्थळं आहे. वारसास्थळांच्या मानकांनुसार त्यांची देखभाल आणि अपग्रेडेशन केले जाईल. आणि यापुढेही त्यांचा वापर व्हावा यासाठी त्यांना तयार केले जाईल. हरदीपसिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेशी संबंधीत कामांसाठी जुन्या संसदेचा वापर होत राहील.

पुरातन मंदिरासारखे बांधले होते संसद भवन
देशाच्या संसदेचे बांधकाम स्वातंत्र्यपूर्वकाळात सुरु झाले आणि सहा वर्षांत संपले होते. याचे उद्घाटन तत्कालिन व्हाइसरॉय लॉर्ड इर्विन यांनी १८ जानेवारी १९२७ रोजी केले होते. या इमारतीचे वास्तुरचनाकार एड्विन लुटियन्स आणि सर हरबर्ट बेकर होते. त्यांनी मध्यप्रदेशातील चंबळ खोऱ्यातील चौसष्ट योगिनी या पुरातन मंदिरांच्या धर्तीवर गोलाकार भारतीय संसदेची निर्मिती केली होती. या बांधकामासाठी तेव्हा ८३ लाख रुपये खर्च आला होता.

First Published on: May 25, 2023 1:54 PM
Exit mobile version