नवीन वर्षात स्मार्टफोनवरून WhatsApp गायब

नवीन वर्षात स्मार्टफोनवरून WhatsApp गायब

'व्हॉटसअप'!

नवीन वर्षात व्हॉट्सअॅप मोबाईलमधून गायब होणार आहे. व्हॉट्सअ्रपने विंडोज मोबाईल ऑपरेटींग सिस्टिमला बाय-बाय करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबरनंतर विंडोज मोबाईल ऑपरेटींग सिस्टिमवर चालणाऱ्या कोणत्याही स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप ऑफलाईन असेल.याशिवाय काही अॅण्ड्राईड आणि आयओएस डिव्हाईसवरूनही व्हॉट्सअॅप गायब होणार आहे.

व्हॉट्सअॅपने एफएक्यू सेक्शनमध्ये यासंबंधी माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, डिसेंबर २०१९ नंतर विंडोज मोबाईल ऑपरेटींग सिस्टमवर चालणाऱ्या कोणत्याही मोबाईलवर व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही. याशिवाय फेब्रुवारी २०२० मध्ये काही अॅण्ड्राईड आणि आयओएस डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप काम करणार नाही.

अॅण्ड्राईड वर्जन २.३.७ या तसेच यापेक्षा जुन्या वर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप काम करणार नाही. याशिवाय आयओएस ८ आणि यापेक्षा जुन्या ऑपरेटींग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनवरही व्हॉट्सअॅप काम करणार नाही.

First Published on: December 31, 2019 11:28 AM
Exit mobile version