दुकानदार १ रुपयाचे नाणे घेत नाही, मग करायचे काय? वाचा RBIच्या गाईडलाईन

दुकानदार १ रुपयाचे नाणे घेत नाही, मग करायचे काय? वाचा RBIच्या गाईडलाईन

तुमच्याकडे १ रुपयाचे नाणे नक्की असेल. पण जेव्हा तुम्ही हेच १ रुपयाचे नाणे घेऊन दुकानावर गेलात आणि दुकानदाराने नाणे घेण्यास मनाई केली तर? बऱ्याच लोकांना १० रुपयाच्या नाण्यामुळेही अशीच समस्या आली होती. परंतु सध्या लोकं १ रुपयाच्या नाण्यांमुळे अशा प्रकारची तक्रार करत आहेत. तर तुमच्यासोबत असेच झाले तर काय करू शकता? हे जाणून घ्या

आरबीआयच्या गाईडलाईननुसार, पोस्ट ऑफिस सर्व प्रकारच्या नोटा आणि नाणी घेतात. त्यामुळे तुम्ही १ रुपयाचे नाणे पोस्ट ऑफिसमध्ये जमा करू शकता किंवा आपल्या जवळील पोस्ट ऑफिसमधून काहीतरी खरेदी करू शकता.

एका व्यक्तीने ट्वीटद्वारे केली होती तक्रार

एका व्यक्तीने ट्वीटरद्वारे आरबीआय, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या ऑफिसला टॅग करून तक्रार केली होती. सुधांशु दुबे असे ट्वीटर युजरचे नाव असून त्याने १ रुपयाच्या नाण्याचे फोटो शेअर करत विचारले की, अशा प्रकारची नाणी भारतात बंद झाली आहेत का? जर असे झाले असेल, तर ही नाणी कुठे जमा करायची. तसेच जर दुकान व्यतिरिक्त भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नाणी घेण्यास नकार कसा दिला जाऊ शकतो?

पोस्टाने दिले त्या ट्वीट युजरला उत्तर

युजरच्या या पोस्टला भारतीय पोस्टाने उत्तर दिले आहे. त्यामध्ये लिहिले की, आरबीआयकडून जारी केलेली सर्व नाणी आणि नोटा पोस्ट ऑफिसमध्ये घेतली जातात. तुमच्या तक्रारीचा संदर्भ घेऊन, संबंधित पोस्ट ऑफिसला आरबीआयने जारी केलेली सर्व प्रकारची नाणी आणि नोटा स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर व्यक्त केली.


हेही वाचा – PNB Scam : पीएनबी घोटाळ्यातील सुभाष शंकर परबला भारतात आणण्यात सीबीआयला यश


 

First Published on: April 12, 2022 10:32 AM
Exit mobile version