घरताज्या घडामोडीPNB Scam : पीएनबी घोटाळ्यातील सुभाष शंकर परबला भारतात आणण्यात सीबीआयला यश

PNB Scam : पीएनबी घोटाळ्यातील सुभाष शंकर परबला भारतात आणण्यात सीबीआयला यश

Subscribe

कोट्यावधीच्या पंजाब नॅशनल बॅंक (PNB) घोटाळ्यातील मु्ख्य आरोपी नीरव मोदीच्या अतिशय़ जवळच्या असणाऱ्या सुभाष शंकर परबला भारतात आणण्यात केंद्रीय तपास यंत्रणांना यश आले आहे. इजिप्तच्या कैरो शहरात सेंट्रल ब्युरो ऑफ इनवेस्टीगेशन (CBI) च्या टीमने एक मोठे ऑपरेशन राबवत सुभाष शंकर परबला मुंबईत आणले आहे. पीएनबी स्कॅम हा १३ हजार ५७८ कोटी रूपयांचा घोटाळा समोर आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयच्या टीमने सुभाष शंकर परबला भारतात आणण्याची मोहीम आखली होती. अखेर या मोहिमेला यश मिळाल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

पीएनबी बॅंक घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असा सुभाष शंकर परब हा होता. नीरव मोदींच्या कंपनीत डीजीएम (फायनान्स) पदावर सुभाष शंकर परब कार्यरत होता. २०१८ मध्ये इंटरपोलने पीएनबी घोटाळ्यात सीबीआयच्या विनंतीवरून रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यामध्ये नीरव मोदी, निशाल मोदी आणि सुभाष शंकर या तिघांच्या नावे ही नोटीस जारी करण्यात आली होती.

- Advertisement -

सुभाष शंकर परब ही ४९ वर्षीय व्यक्ती २०१८ मध्ये नीरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांच्यासोबत भारतातून पळाला होता. काहिरातून मुंबईत आणल्यानंतर सीबीआयने या व्यक्तीला अटक केली आहे. सीबीआय या व्यक्तीला मुंबई हायकोर्टात उपस्थित करून कोठडी मागण्याची शक्यता आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणात या व्यक्तीची चौकशीसाठी ही कोठडी मागितली जाऊ शकते. आज दुपारी १२ वाजता मुंबईच्या सीबीआय कोर्टात या व्यक्तीला आणले जाण्याची शक्यता आहे.

डीजीएम पदावर असताना सुभाष शंकर परब याने पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षीदारांच्या बाबतीत दबाव आणल्याची शक्यता सीबीआयला वाटते आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांचे अपहरण केल्याचीही शक्यता सीबीआयला वाटत आहे. त्यामुळेच सीबीआयकडून या व्यक्तीचा ताबा मागितला जाणार आहे. याआधी सीबीआयने नीरव मोदी, निशाल मोदी यांच्यासोबतच सुभाष शंकर परब विरोधातही चार्जशीट दाखल केली आहे.

- Advertisement -

नीरव मोदी तसेच मेहुल चोक्सी यांच्यावर सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक पीएनबीचे कर्जबुडवे प्रकरणात १४ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तसेच हा घोटाळा उघडकीस येताच दोघांनीही देश सोडला. त्यानंतर अनेक प्रयत्नांनंतरही या दोघांनाही भारतात आणण्यात तपास यंत्रणांना शक्य झाले नाही. पण सुभाष शंकर परब याला भारतात आणण्यात केंद्रीय तपास यंत्रणांना मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -