Covid 19: भारतीय नागरिकांना रोजगार आणि पर्यटक म्हणून ‘या’ देशांत जाण्यास परवानगी!

Covid 19: भारतीय नागरिकांना रोजगार आणि पर्यटक म्हणून ‘या’ देशांत जाण्यास परवानगी!

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून भारतीय नागरिकांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले गेले. कोरोनादरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशात विमान प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली होती.
कोरोनामुळे जगातील अनेक देशांनी भारतीय प्रवासांना विमान प्रवास करण्यास निर्बंध घातले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे हे निर्बंध लवकर हटवण्यात येतील अशी कोणतीही शक्यता नाही. अशा परिस्थितीत अमेरिकेसह काही देशांनी विद्यार्थी, नोकरी व्यवसाय आणि इतरांना सूट दिली आहे. मात्र कोरोना व्हेरिएंटचा संसर्ग पाहता बर्‍याच देशांनी अद्याप विमान प्रवासासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही.

रशिया, सर्बिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, किर्गिझस्तान, अल्बेनिया अशा काही देशात भारतीय नागरिकांना प्रवास करताना कोणतेही निर्बंध नसल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी काही ठराविक अटींसह प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. प्रवास करणार्‍या लोकांना क्वारंटाईन राहावे लागणार असून कोरोनाची चाचणी झाल्यानंतर त्याचा प्रवाशांना त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह दाखवणं बंधनकारक असणार आहे.

या देशात असे आहे निर्बंध

तुर्की

तुर्की या देशाने भारतीय प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी दिली आहे, परंतु कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह दाखवण्यासह त्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहणं आवश्यक असणार आहे.

दक्षिण कोरिया

दक्षिण कोरियामध्ये फक्त अशा भारतीय प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे, ज्यांनी कोव्हिशील्ड या लसीचे दोन डोस घेतले आहेत. यासह त्यांना या देशात देखील त्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहणं आवश्यक असणार आहे.

जर्मनी

जर्मनी या देशात भारतीयांवरील प्रवासी बंदी उठविण्यात आली आहे. जर्मनीने भारतीय व्हेरिएंटच्या चिंतेच्या देशांच्या विभागातून भारत देशाला दूर केले आहे. या देशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक आहे तसेच त्यांना १० दिवस क्वारंटाईन राहणं आवश्यक असणार आहे.

युएई

युएई या देशाने भारतीय प्रवाशांवर लादलेली बंदी ३१ जुलैपर्यंत वाढविली आहे. युएईने ट्विटरच्या माध्यमातून असे सांगितले की, कोरोनामुळे भारतातून येणाऱ्या विमानांवरील बंदी वाढविण्यात आली आहे.


पेगास फोन टॅप कनेक्शन, मोदी सरकारमधील मंत्री, खासदार नेत्यांच्या फोन टॅपिंगची चर्चा

First Published on: July 19, 2021 8:05 AM
Exit mobile version