घरताज्या घडामोडीपेगास फोन टॅप कनेक्शन, मोदी सरकारमधील मंत्री, खासदार नेत्यांच्या फोन टॅपिंगची चर्चा

पेगास फोन टॅप कनेक्शन, मोदी सरकारमधील मंत्री, खासदार नेत्यांच्या फोन टॅपिंगची चर्चा

Subscribe

रविवारी प्रकाशित होणाऱ्या अहवालामुळे अधिवेशनाचा पहिला अठवडा चांगलाच गाजणार

वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियन या दोन वृत्तपत्रांमध्ये भारतातील पेगासस फोन टॅपिंग कनेक्शनवर अहवाल प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन महिती दिली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार १९ जुलैपासून सुरु होणार आहे. संसदीय अधिवेशनाच्या पहिला आठवडा प्रकाशित होणाऱ्या अहवालामुळे वादळी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मोदी सरकारमधील मंत्री, खासदार, नेते आणि विरोधकांचेही फोन टॅप करण्यात आल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत दोन वृत्तपत्रांत लेख छापून येणार आहे.

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, रविवारी संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियन या वृत्तपक्षात एक अहवाल प्रकाशित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अहवालामध्ये मोदी सरकारमधील मंत्री, आरएसएस नेते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि पत्रकारांचे टॅप करण्याबाबत खुलासा होणार आहे. भारतातील नेत्यांचे फोन टॅफ करण्यासाठी इस्रायली फर्म पेगाससची मदत घेतील गेली असल्याचे सुब्रमण्यम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनीही या प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे. डेरेक ओ ब्रायन यांनी म्हटलय की केवळ भाजप नेते नाहीतर विरोधकांचेही फोन टॅप करण्यात आले आहेत. म्हणजेच यामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांचाही समावेश आहे. गल्फ न्यूजमध्ये काम करणाऱ्या जेष्ठ पत्रकार शीला भट्ट यांनी ट्विट करुन संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी होणार असल्याची माहिती दिली आहे. शीला भट्ट यांनी म्हटलं आहे की, रविवारी प्रकाशित होणाऱ्या अहवालामुळे अधिवेशनाचा पहिला अठवडा चांगलाच गाजणार आहे. आता फक्त हे पाहायचे आहे की, फोन टॅपिंगच्या प्रकरणामुळे कुणाला किती फरक पडेल आणि कोणत्या गोष्टी बाहेर येतील असे शीला भट्ट यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पेगासस फोन टॅपिंगवर पत्रकार अरविंद गुणशेखर यांनी म्हटलं आहे की, आता पाहायचे आहे हा अहवाल कसा काम करतो आहे. तसेच वादळापुर्वीची शांतता असल्याचे रोहिणी यांनी म्हटल आहे. जर हा फोन टॅपिंगची चर्चा खरी असेल तर खुप मोठी घटना घडणार असल्याचेही पत्रकार खालिद यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पेगासस सॉफ्टवेअर काय आहे?

पेगासस हा एक इस्रायलचा सॉफ्टवेअर असून याचा वापर जगभरातील गुप्त माहिती गोळा करण्यासाठी करण्यात येतो. भारतातील पत्रकारांचे आणि समाजसेवकांचे फोन टॅप करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला असल्याची चर्चा आहे. या चर्चा आणि आरोपांचे खंडन करुन कंपनीने म्हटलं होते की पेगासस केवळ सरकारी कामांसाठी वापरण्यात येत आहे. परंतु आता या सॉफ्टवेअरचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आले असून सर्वांच्या नजरा याकडे लागल्या आहेत. संसदीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला अशा प्रकारचा चर्चा सुरु झाल्यानं राजकीय वर्तुळातही तणावाचं वातावरण तयार झालं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -