‘आप’ला मिळाला राष्ट्रीय दर्जा तर, तृणमूल काँग्रेससह ‘भाकप’ झाले प्रादेशिक पक्ष

‘आप’ला मिळाला राष्ट्रीय दर्जा तर, तृणमूल काँग्रेससह ‘भाकप’ झाले प्रादेशिक पक्ष

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ‘आप’ला मोठा दिलासा मिळाला आहे तर, दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जी रद्द करण्यात आला आहे. (While AAP got national status BCP along with Trinamool Congress become regional parties)

आम आदमी पक्षासाठी केंद्रीय निवडणूक आयोगचा हा निर्णय मोठी झेप मानला जात आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी आणि सीपीआय आता प्रादेशिक पक्ष म्हणून राहणार आहेत. दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांतील निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष घोषित करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष सत्तेत आहे.

आयोगाने सोमवारी जारी केलेल्या आदेशात उत्तर प्रदेशातील आरएलडी, आंध्र प्रदेशातील बीआरएस, मणिपूरमधील पीडीए, पुद्दुचेरीतील पीएमके, पश्चिम बंगालमधील आरएसपी आणि मिझोराममधील एमपीसी यांना दिलेला प्रादेशिक पक्षाचा दर्जाही रद्द केला आहे. तसेच, नागालँडमध्ये लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), मेघालयातील वॉईस ऑफ पीपल पार्टी आणि त्रिपुरातील टिपरा मोथा यांना प्रादेशिक पक्षांचा दर्जा देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.


हेही वाचा – मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द; शरद पवारांना मोठा धक्का

First Published on: April 10, 2023 9:28 PM
Exit mobile version