घरताज्या घडामोडीमोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द; शरद पवारांना मोठा धक्का

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द; शरद पवारांना मोठा धक्का

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 18 पानांची नोटीस काढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. (Big shock to Sharad Pawar National status of NCP Congress party cancelled)

केंद्रीय निवडणूक आयोगाने 18 पानांची नोटीस काढली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याबाबत आज संध्याकाळी घोषणा केली.

- Advertisement -

1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जानेवारी 2000 ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता.

तृणमुल काँग्रेस आणि सीपीआयलाही फटका

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमुल काँग्रस पक्ष आणि सीपीआय पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत.

किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली आहे.


हेही वाचा – ‘अरे भास्कर… आता बस कर..’, बावनकुळेंवर टीका करताच चित्रा वाघ संतापल्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -