Omicron Variant: ओमिक्रॉनबाबत WHOचं चिंताजनक वक्तव्य; मृत्यूदरात होऊ शकते वाढ

Omicron Variant: ओमिक्रॉनबाबत WHOचं चिंताजनक वक्तव्य; मृत्यूदरात होऊ शकते वाढ

covid cases in india : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग, 24 तासात 2 लाख 64 नवे रुग्ण

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. सातत्याने ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जरी ओमिक्रॉन व्हेरिएंट इतर कोरोना व्हेरिएंटपेक्षा घातक नसल्याचे बोलले जात असले तरी आता जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनबाबत चिंताजनक वक्तव्य केले आहे. काल, ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा मृत्यू जगातील पहिला ओमिक्रॉनचा बळी होता. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, या नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णालये भरण्यासोबत मृत्यू दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, जागतिक स्तरावर व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित केलेल्या ओमिक्रॉनमुळे केसेस वाढल्यामुळे असे वाटते की, रुग्णालये भरण्याची आणि मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नवीन व्हेरिएंटमुळे संक्रमित लोकांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक माहिती आवश्यक आहे. त्यामुळे देशातील रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांशी संबंधित माहिती जारी करण्यास सांगितले आहे.

आतापर्यंत ओमिक्रॉन ६० देशांमध्ये पसरला

गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने नव्या व्हेरिएंटबाबत खूप माहिती दिली होती. यादरम्यान संघटनेने म्हटले होते की, नव्या व्हेरिएंटचा मोठा प्रभाव महामारीवर पडू शकतो. हा व्हेरिएंट आतापर्यंत ६० देशांमध्ये पसरला आहे.

कॅनडामध्ये ओमिक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड

कॅनडामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा कम्युनिटी स्प्रेड होत आहे. देशाच्या मुख्य सार्वजनिक आरोग्य अधिकारी थेरेसा तामो यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, आम्ही कम्युनिटी ट्रान्समिशनला पाहत आहोत. तसेच देशात देखील कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाली आहे, परंतु येणाऱ्या दिवसात याचा वेग वाटू शकतो. मागील बऱ्याच काही दिवसांमध्ये या व्हेरिएंटबाबत बरीच माहिती मिळाली आहे.


हेही वाचा – Omicron Variant : ओमिक्रॉन डेल्टापेक्षा दोन पट घातक, भारतात रूग्ण वाढण्याची शक्यता


 

First Published on: December 14, 2021 7:13 PM
Exit mobile version