घरताज्या घडामोडीOmicron Variant : ओमिक्रॉन डेल्टापेक्षा दोन पट घातक, भारतात रूग्ण वाढण्याची शक्यता

Omicron Variant : ओमिक्रॉन डेल्टापेक्षा दोन पट घातक, भारतात रूग्ण वाढण्याची शक्यता

Subscribe

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने ब्रिटेनमध्ये धुमाकूळ घातला आहे. ब्रिटनची परिस्थिती पाहिली असता ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रूग्णाचा मृत्यू झाला असून हा पहिला रूग्ण ठरला आहे. तसेच याबाबची माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे. १३ डिसेंबर रोजी कोविड-१९ च्या नव्या व्हेरियंटमुळे पहिल्या रूग्णाचा मृत्यू झाला. असं जॉन्सन यांनी म्हटलंय. आतापर्यंत संपूर्ण जगभरातील ६४ देशांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने देखील ओमिक्रॉनला डेल्टापेक्षा अधिक पसरण्यायोग्य आणि कमी प्रभावी लस प्रकार म्हणून संबोधलं आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टा व्हेरियंटला मागे टाकेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कोविड-१९ बुस्टर डोसचा कार्यक्रम वेगाने राबवला जात आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत २.२ कोटी लोकांना बुस्टर डोस देण्यात आला आहे, असे ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

ओमिक्रॉनचा धोका तीन पटीने वाढला

न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, ज्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे. त्यांना ब्रिटनमधील संशोधकांनी जवळपास १२१ कुटुंबांवर संशोधन केले आहे. ओमिक्रॉनमध्ये डेल्टाच्या तुलनेत कौटुंबिक संक्रमणाचा धोका ३.२ पट जास्त आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यापासूनच व्हेरियंटच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच त्यामधील काही जण हे कोविड-१९ शी संक्रमित आहेत. डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉनचा धोका तीन पटीने वाढल्याची माहिती WHOने दिली आहे.

दिल्लीमध्ये आढळले ओमिक्रॉनचे ४ नवे रूग्ण

दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे ४ नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण संख्या ही ३५ वर गेली आहे. त्यामधील ३ जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं आहे. देशातील काही राज्यांत ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. राजस्थान, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि चंदीगडमध्ये ओमिक्रॉनचा रूग्ण आढळला आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत १८ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तर राज्यातही ही संख्या हळूहळ वाढत आहेत. मात्र, आता इतर देशात बूस्टर डोसची मागणी वाढताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Paytm Offer : LPG सिलिंडरची Paytm वरून नोंदणी केल्यास मिळणार ३ हजार पर्यंतचा कॅशबॅक, जाणून घ्या स्कीम ?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -