कोरोनाच्या वारंवार संसर्गामुळे रोग प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम; WHO तज्ज्ञांचे मत

कोरोनाच्या वारंवार संसर्गामुळे रोग प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम; WHO तज्ज्ञांचे मत

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशात जर कोरोनाची लागण झाल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि भविष्यात संसर्गाशी लढा देता येतो हा सिद्धांत पूर्णपणे खरा होऊ शकत नाही, असा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डेव्हिड नाबरो म्हणाले की, वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे बराच काळ संसर्ग होण्याचा धोका असतो.

नाबरो म्हणाले की, कोरोनाच्या वारंवार संसर्गामुळे शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होत नाही कारण विषाणू नेहमीच त्याचे स्वरुप बदत असतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग जास्त काळ राहू शकतो.

ते म्हणाले की, जितक्या वेळा तुम्ही कोरोनाच्या जाळ्यात अडकाल तितकी तुमची आरोग्य स्थिती ढासळण्याची शक्यता आहे, यात पुन्हा कोरोना संक्रमण होईपर्यंत तुम्ही आजारी राहू शकता. आपल्यापैकी कोणत्याही परिस्थितीचा सामना करु इच्छित नाही, कारण ते खूप गंभीर असू शकते. यामुळे जीवनाची गती कित्येक महिने थांबवू शकते.

लॉन्ग कोविडची लक्षणे सुरू झाल्यानंतर चार आठवडे किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर दिसू शकतात. थकवा, धाप लागणे, लक्ष एकाग्र न होणे, सांधेदुखी अशी अनेक लक्षणे कोविडचा दीर्घकाळ प्रभाव दाखवतात. ही सर्व लक्षणे तुमच्या दैनंदिन कामांवरही परिणाम करू शकतात.

नाबरो यांनी यापूर्वी म्हटले होते की, कोरोना संसर्ग आता बहुतेक लोकांसाठी घातक होण्याऐवजी असुविधाकारक बनला आहे. अशा लोकांबाबत नाबरो चिंता व्यक्त केली आहे, जे वृद्ध आणि आजारी आहेत किंवा कोणत्याही मोठ्या आजाराने ग्रस्त आहेत कारण कोरोना संसर्ग अशा लोकांना अधिक त्रास देऊ शकतो.

ते पुढे म्हणाले की, मी संपूर्ण जगासाठी चिंतित आहे कारण माझा विश्वास आहे की, या महामारी दरम्यान बऱ्याच गोष्टी आपण शिकलो, कारण कोरोना व्हायरस अजूनही विकसित होत आहे. जे वृद्ध आहेत किंवा इतर आजारांनी ग्रस्त आहेत त्यांच्याबद्दल मला काळजी वाटते. त्यामुळे धोका अजून संपलेला नाही. ज्यांना लसीकरण केले गेले नाही त्यांच्याबद्दल मी चिंतित आहे.


देशासह राज्यातही कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण


First Published on: July 1, 2022 9:43 PM
Exit mobile version