देशासह राज्यातही कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 14,506 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे

सध्या भारतात कोरोना पुन्हा आपली मान वर करू लागला आहे. दिवसेंदिवस पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होऊ लागली असून आता कोरोना रूग्णांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात कोरोना रूग्णांची पुन्हा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 14,506 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 4 तासांत देशभरात कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू झालेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार कालच्या तुलनेत आज कोरोनाचे अधिक रूग्ण आढळले आहेत.

देशभरात मंगळवारी कोरोनाचे 11,793 नवीन रूग्ण आढळले असून कोरोनामुळे 27 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच सोमवारी देशभरात 17,073 रूग्ण आढळले होते. दरम्यान आता आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 99,602 रूग्ण सध्या सक्रिय आहेत. त्यापैकी काही रूग्ण आता हळूहळू बरे होऊ लागले आहेत.

कोरोनाचे वाढते चित्र पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आता काही शहरांमध्ये यासाठी विशेष नियमावली आखण्यात येत आहे.

मुंबईत सर्वाधिक कोरोना रूग्ण
मंगळवारी मुंबईत सर्वाधिक रूग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी ऐकूण दिवसभरात 3566 नव्या रूग्ण आढळले आहेत.तसेच यातील 5 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच मुंबईत सध्या 11,988 रूग्ण सक्रिय आहेत, तर ठाण्यात 5931 रूग्ण सक्रिय आहेत.