Who is Parag Agarwal: जॅक डोर्सी यांनी ट्वीटरच्या सीईओ पदाचा दिला राजीनामा, कोण आहेत ट्वीटरचे नवे सीईओ?

Who is Parag Agarwal: जॅक डोर्सी यांनी ट्वीटरच्या सीईओ पदाचा दिला राजीनामा, कोण आहेत ट्वीटरचे नवे सीईओ?

Who is Parag Agarwal: जॅक डोर्सी यांनी ट्वीटरच्या सीईओ पदाचा दिला राजीनामा, कोण आहेत ट्वीटरचे नवे सीईओ?

मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्वीटरचे सह संस्थापक जॅक डोर्सी यांनी काल, सोमवारी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीच्या बोर्डने मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) पराग अग्रवाल यांची कंपनीचे नवीन CEO म्हणून नियुक्ती केली. डोर्सी म्हणाले की, ‘मी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला आहे, कारण मला विश्वास आहे की, कंपनी तिच्या संस्थापकांपासून पुढे जाण्यास तयार आहे.’ ट्वीटरचे नवे सीईओ अग्रवाल यांच्याबाबत डोर्सी म्हणाले की, ‘सीईओ म्हणून पराग यांच्यावर माझा विश्वास आहे. गेल्या १० वर्षात त्यांनी येथे केलेले काम अभूतपूर्व आहे.’ कोण आहेत ट्वीटरचे नवे सीईओ? वाचा

२०११ साली पराग अग्रवाल ट्वविटरसोबत जोडले. यापूर्वी याहू आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गज कंपनीसोबत त्यांनी काम केले आहे. पराग अग्रवाल आयआयटी बॉम्बचे माजी विद्यार्थी आहेत. याशिवाय त्यांनी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली आहे.

अॅड्स इंजिनिअर (जाहिरात अभियंता) म्हणून ट्वीटरसोबत जोडले गेलेले पराग अग्रवाल यांना ऑक्टोबर २०१७मध्ये कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) बनवण्यात आले. पराग अग्रवाल हे कंपनीचे तांत्रित धोरण हाताळत पुढे आले आहेत. पीपलआयच्यानुसार पराग यांची एकूण संपत्ती १.५२ मिलियन डॉलर आहे.

पराग अग्रवाल यांची ट्वीटरच्या सीईओ पदावर नियुक्ती केल्यानंतर ते म्हणाले की, ‘माझ्या नियुक्तीबद्दल मी अत्यंत सन्मानित आणि आनंदी आहे.’ डोर्सी यांच्या सतत मार्गदर्शन आणि मैत्रीसाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान जॅक डोर्सी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्विटरची स्थापना केली होती. २००८ मध्ये सीईओच्या पदी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. २००८ मध्ये त्यांना काही कारणास्तव बाहेर सुद्धा करण्यात आले होते. परंतु माजी सीईओ डिक कोस्टोलो यांनी सीईओ पदाचा पदभार सोडल्यानंतर डोर्सी यांनी २०१५ मध्ये ट्विटरच्या सीईओचा कार्यभार सांभाळण्यास सुरूवात केली.


हेही वाचा – जगातील पहिला 18GB रॅमचा स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत


 

First Published on: November 30, 2021 7:53 AM
Exit mobile version