‘मसूद अझहरला कुणी सोडले, मोदींनी उत्तर द्यावे’

‘मसूद अझहरला कुणी सोडले, मोदींनी उत्तर द्यावे’

राहुल गांधी

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे काही दिवसांपूर्वीच उघड झाले आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जैश’चा म्होरक्या मसूद अझहर याच्या सुटकेच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. ‘मसूद अजहरची १९९९ मध्ये भारताच्या कैदेतून सुटका कोणी केली होती, हे मोदींनी पुलवामातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना सांगावं’, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी ट्वीटरद्वारे केलं आहे. याशिवाय  त्यांनी १९९९ साली मसूदच्या सुटकेवेळीचे अजित डोभाल यांचे फोटोही ट्वीट केले आहे. या फोटोंमध्ये त्यांनी ‘वाटाघाटी करणारी व्यक्ती’ डोभाल यांना असं म्हटलं आहे. याशिवाय पुलवामामधील शहीदांचा मारेकरी असलेल्या अझहरची भारतातून सुटका करणारे कोण होते? याचं उत्तर मोदींनी दहशतवाद्यांच्या परिवाराला सांगावे अशी मागणीही केली आहे. राहुल यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेच याचे ‘डील मेकर’ असल्याचं म्हटलंय.

रविवारी राहुल गांधी निवडणुक प्रचारासाठी कर्नाटकमध्ये गेले होते. त्यावेळीही त्यांनी १९९९मध्ये केल्या गेलेल्या मसूद अजहरच्या सुटकेवरुन भाजपावर निशाणा साधला. प्रचारादरम्यान याविषयी काही जुने दाखले देत राहुल म्हणाले की, ‘१९९९ मध्ये ज्यावेळी वायपेयी यांचे सरकार होते, त्यावेळी मसूद अजहरससोबत भारताने काही दहशतवाद्यांनाही सोडले होते. दहशतवाद्यांनी इंडिअन एअरलाइन्सचे विमान १५० प्रवाशांसह हायजॅक करुन अफगाणिस्तानातील कंदाहर येथे नेले होते.’ दरम्यान, ‘देशातील सर्वांत जुना पक्ष असलेली काँग्रेस कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही’, असेही ते यावेळी म्हणाले.


वाचा: राज ठाकरे आमच्या मनातलंच बोलले – जितेंद्र आव्हाड

First Published on: March 11, 2019 1:09 PM
Exit mobile version