WHOच्या प्रमुख संशोधकांनी भारतातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दिली नवीन चेतावणी

WHOच्या प्रमुख संशोधकांनी भारतातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दिली नवीन चेतावणी

WHOच्या प्रमुख संशोधकांनी भारतातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दिली नवीन चेतावणी

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना( WHO) नेहमीच भारताला कोरोनाविषयी महत्त्वाचा सूचना,सल्ले देत असते. आताही जागतिक आरोग्य संघटनेने भारतातीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन चेतावणी दिली आहे. WHOच्या चीफ संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी असे म्हटले आहे की, येणाऱ्या काळात भारतातील कोरोना परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. पुढील ६ ते १८ महिने भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, महामारीशी लढणे हे व्हायरसच्या विकासावर अवलंबून आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी लसीपासून तयार होणारी इम्युनिटी किती काळ लोकांचा बचाव करु शकते यावर अवलंबून आहे. २०२१च्या शेवटापर्यंत जगातील ३० टक्के लोकसंख्येने लसीकरण केलेले असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मृत्यूंच्या संख्येतही घट होत असेल, असे चित्र दिसणे महत्त्वाचे आहे.

सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार, आपण आजही अशा परिस्थितीतून जात आहोत जिथे आणखी संकट येणे बाकी आहे. पुढील ६ ते १२ महिन्यात आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हा काळ सर्वांसाठी खूप कठीण असणार आहे. त्याचप्रमाणे लस घेतल्यानंतर तयार होणारी इम्युनिटी सिस्टम कोरोना संक्रमणापासून कमीत कमी आठ महिने रोखू शकते,असे त्या म्हणाल्या. त्यामुळे औषधांचा गैरवापर केला तर त्याचे जास्तीत जास्त दुष्परिणाम भोगावे लागतील. आजही अनेक देश कोरोना महामारीतून बाहेर येण्यासाठी WHOच्या प्रोटोकॉल्सचा सल्ला घेत आहेत,असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे पुढील काळात भारताला आणखी सर्तक राहण्याची गरज आहे.


हेही वाचा – मायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचाऱ्यासोबत बिल गेट्स यांचे होते अफेअर, नवा खुलासा

 

 

 

First Published on: May 17, 2021 9:05 PM
Exit mobile version