घरताज्या घडामोडीमायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचाऱ्यासोबत बिल गेट्स यांचे होते अफेअर, नवा खुलासा

मायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचाऱ्यासोबत बिल गेट्स यांचे होते अफेअर, नवा खुलासा

Subscribe

प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी काही दिवसांपूर्वी पत्नी मेलिंडा गेट्स यांच्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. २७ वर्षांच्या वैवाहिक नात्यातून विभक्त होत त्या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी संयुक्त पत्रक जारी करत दोघांची भूमिका स्पष्ट केली. तेव्हापासून बिल गेट्स हे चर्चेत असून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रकारचे खुलासे होत आहेत. आता बिल गेट्स वैवाहिक असूनही काही कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना डेटवर येण्यासाठी विचारले होते. यातील एका महिला कर्मचाऱ्याशी त्यांचे प्रेमसंबंधात होते, असा दावा एका अहवालातून केला आहे.

या अहवालातून समोर आले की, ‘२००० साली बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करणाऱ्या एका इंजिनिअर महिला कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. या अफेरचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा या महिलेने २०१९ साली कंपनीच्या बोर्डाला पत्र लिहून अफेअरबाबत माहिती दिली होती. दरम्यान बिल गेट्स आणि मेलिंडा यांचे लग्न १९९४ साली झाले होते.’

- Advertisement -

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने २०१९मध्ये मिळालेल्या पत्राबाबत सांगितले की, बिल गेट्स २००० साली कंपनीतील एका महिला कर्मचारीसोबत संबंध बनवत असल्याची माहिती दिली आहे. बोर्डाच्या एका समितीने या प्रकरणाचा आढावा घेतला आणि चौकशीसाठी बाहेरील कायदा संस्थेची मदत घेतली. संपूर्ण चौकशीदरम्यान मायक्रोसॉफ्टने या प्रकरणात चिंता व्यक्त करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला पूर्ण पाठिंबा दिला. मायक्रोसॉफ्टच्या संचालकांना महिला कर्मचाऱ्यासोबत गेट्स संबंधित असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे त्यांना बोर्डातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कंपनीने तपासाबद्दल अधिक माहिती दिली नाही आहे. पण तपास पूर्ण होण्यापूर्वी बिल गेट्स यांनी राजीनामा दिला होता.

गेट्स यांच्या एका प्रवक्ताने सांगितले की, महिला कर्मचाऱ्यासोबतचे संबंध आणि बोर्ड सोडण्याचा त्यांचा निर्णय या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. सुमारे २० वर्षांपूर्वी अफेअर होते, जे संपले आहे.

- Advertisement -

समाजसेवा करण्यासाठी बोर्ड सोडल्याचे सांगण्यात बिल गेट्स यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये सांगितले होते की, परोपकारात जास्त वेळ घालवण्यासाठी आपण बोर्ड सोडत आहोत. मायक्रोसॉफ्टने त्यावेळी सांगितले होते की, गेट्स २००८ पासून डे-टू-डेच्या भूमिकेत सक्रिय नव्हते. गेट्स यांनी १९७५ मध्ये सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली आणि २००० पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्याच वर्षी त्याचे फाउंडेशन सुरू झाले होते.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -