कोरोनाचं संक्रमण वेगाने वाढतंय; जवळपास ५०,००० जणांचा मृत्यू होणार – WHO

कोरोनाचं संक्रमण वेगाने वाढतंय; जवळपास ५०,००० जणांचा मृत्यू होणार – WHO

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अॅडहॅनॉम घेबेरियसस

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी बुधवारी कोविड-१९चं संक्रमण वेगाने आणि जगभरात पसरत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचं सावट आता २०५ देश व प्रदेशात पोहोचलं आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ लाख ३५ हजार ९५७वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा हा ४७ हजार २४५वर पोहचला आहे. आतापर्यंत १ लाख ९४ हजार २८६ जण बरे झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अॅडहॅनॉम घेबेरियसस यांनी जिनेव्हा येथे सांगितलं की, गेल्या पाच आठवड्यांत नवीन घटनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि मृत्यूची संख्या गेल्या आठवड्यात दुपटीने वाढली आहे. येत्या काही दिवसांत जगभरात १ दशलक्ष कोरोनाची प्रकरणं समोर येतील आणि ५० हजार मृत्यू होतील असं ते म्हणाले. दरम्यान, विकसनशील देशांना सामाजिक आणि आर्थिक परिणामांना तोंड देण्यासाठी मदत म्हणून त्यांची एजन्सी, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) कर्जमुक्ती करावी यासाठी समर्थन केल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अॅडहॅनॉम घेबेरियसस म्हणाले.


हेही वाचा – भावाला वाचवलं नाही म्हणून कोरोना रुग्णाने केला डॉक्टरांवर हल्ला


चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा झाला होता. बुधवारी नवीन संक्रमण कमी होत असल्याचे प्रथमच नोंदविण्यात आले आणि पहिल्यांदाच लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या उघडकीस आली. ताप आणि खोकला या आजाराची लक्षणं दर्शविणाऱ्या लोकांकडून हा संसर्ग होतो, परंतु जागतिक आरोग्य संघटनेला त्या आजाराचे संपूर्ण स्पेक्ट्रम शोधणं महत्वाचं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. मारिया वर केरखोव्ह म्हणाल्या.

टेड्रॉस यांनी प्रस्तावित कर्जमुक्तीचा संदर्भ देताना म्हणाले, बरेच देश, विकसनशील देश विशेषत: लॉकडाऊन दरम्यान आपल्या नागरिकांना मदत देऊ शकत नाहीत. विशेषत: जे लोक रोजच्या भाकरीसाठी काम करतात. म्हणूनच आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला कर्जमुक्तीसाठी आवाहन केलं की, त्या देशांना कर्जमुक्ती द्या.

 

First Published on: April 2, 2020 9:03 AM
Exit mobile version