Breaking: कोरोनाबाधितांवर उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांना WHO कडून स्थगिती!

Breaking: कोरोनाबाधितांवर उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांना WHO कडून स्थगिती!

WHOने गंभीर कोरोना रुग्णांवर डेक्सॅमेथासोन औषध वापरण्याचा दिला सल्ला

जगातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५५ हजारहून अधिक आहे. तर मृतांचा आकडा ३ लाख ४७ हजारांहून अधिक आहे. या कोरोना मात करण्यासाठी अनेक देशातील वैज्ञानिक लस आणि औषधाचा शोध घेत आहेत. या संकटाच्या काळात भारतासारखा देश हा कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी मलेरियाच्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा वापर करत आहे. तसेच इतर देशांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाची भारताने निर्यात देखील केली आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या वापरावर तूर्तास बंदी घातली आहे.

यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधावर तूर्तास बंदी घालण्यात आली आहे. डेटा सुरक्षा देखरेख मंडळाने आत्तापर्यंत प्राप्त केलेल्या आकडेवारीचे विश्लेषण केले जात आहे.

गेल्या आठवड्यात लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध घेणाऱ्या लोकांना हृदयासंबंधी आजार आणि मृत्यूचा धोका वाढला आहे. यामुळेच जागतिक स्तरावर या औषधाच्या वापरावर तूर्तास बंदी घातली गेली आहे. ही तूर्तास घातलेली बंदी फक्त कोरोनाच्या रुग्णांसंबंधित आहे. या बंदीचा इतर आजारांच्या बाबतीत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या वापरासंदर्भातील नियमांवर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय कोरोना विषाणूच्या उपचारांशी संबंधित असलेले संशोधन सुरुच राहतील, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस म्हणाले.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध  घेत असल्याचे सांगितले होते. तसेच या विशिष्ट औषधामुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध करता येत असे देखील ट्रम्प म्हणाले होते.


हेही वाचा – Coronavirus: भारतातील ‘या’ सात राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करू नका – WHO


 

First Published on: May 26, 2020 8:25 AM
Exit mobile version