कोरोनाचे मूळ उगमस्थान शोधण्यासाठी WHOचे पथक चीन दौरा करणार

कोरोनाचे मूळ उगमस्थान शोधण्यासाठी WHOचे पथक चीन दौरा करणार

कोरोनाचे मूळ उगमस्थान शोधण्यासाठी WHOचे पथक चीन दौरा करणार

चीनमधील वुहान शहरातून कोरोना व्हायरसच्या उद्रेकाला सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण जगात कोरोना व्हायरस कहर सुरू झाला. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेचे पथक कोरोना व्हायरसचे मूळ उगमस्थान शोधण्यासाठी चीनचा दौरा करणार असल्याचे समोर येत आहे. चीनमध्येच कोरोनाचा जन्म झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्यामुळे चीनला जागतिक आरोग्य संघटनेचे पथक तपासणीसाठी जाणार आहे. यासाठी आज चीनमधल्या कम्युनिस्ट सरकारने देखील जागतिक आरोग्य संघटनेला परवानगी दिली आहे, अशी माहिती चिनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियन यांनी दिली आहे.

पुढील आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचा शोध गहन पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. याकरिता सहा महिन्यांहून अधिक कालावधी लागू शकतो, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी वर्तवला आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात १ कोटी २० लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ५ लाख ४८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ६९ लाख ९० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. चीनमधील कोरोनाबाधितांचा आकडा ८३ हजारांहून अधिक आहे. यापैकी ४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. जगात अमेरिका, ब्राझील आणि भारतात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.


हेही वाचा – अमेरिकेचा WHOसोबत काडीमोड, जमा केली कागदपत्र


 

First Published on: July 9, 2020 12:04 AM
Exit mobile version