WHO चा इशारा: ‘कोविड-19 चा प्रसार वेगाने होतोय, जग धोकादायक टप्प्यावर’

WHO चा इशारा: ‘कोविड-19 चा प्रसार वेगाने होतोय, जग धोकादायक टप्प्यावर’

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयेसस

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी जगाला कोरोना विषाणूच्या साथीच्या नव्या आणि धोकादायक अवस्थेविषयी इशारा दिला आहे. ज्यामध्ये लॉकडाऊन असूनही कोरोना वेगाने पसरत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इटलीत हा विषाणू असल्याचे उघडकीस आले तेव्हा असा इशारा देण्यात आला. या विषाणूची लागण झालेले रूग्ण आढळल्याचे कित्येक महिन्यांनंतर समोर आले. त्याचवेळी चीनमध्ये व्हायरसची पहिली घटना समोर आली़ होती. या  विषाणूमुळे जगभरातील ४ लाख ५४ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ८.४ दशलक्ष लोक कोरोनाच्या विळख्यात आहेत. हाच विषाणू आता अत्यंत वेगाने अमेरिका आणि आशियाच्या काही भागांत पसरत आहे.

त्याचबरोबर, युरोपने निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार हा साथीचा रोग अद्याप एक मोठा धोका आहे.

महामारीचा प्रसार अत्यंत वेगाने होतोय

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) चे प्रमुखांनी देखील कोविड-१९ महामारीचा प्रसार अत्यंत वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आल्याचे सांगत त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयेसस यांनी म्हटले आहे की, नवीन कोरोना केसेसमधील अर्ध्या केसेस या उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडातील आहेत तर दक्षिण आशिया आणि पश्चिम आशियात देखील कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होत आहे.

जग कोरोनाच्या धोकादायक टप्प्यावर

यामुळे आता आपण नवीन आणि धोकादायक टप्प्यावर आहोत. महामारीला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची अजूनही आवश्यकता आहे. यासह कोरोना व्हायरस अजूनही अत्यंत वेगाने पसरत आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आणि हात धुण्यासारख्या गोष्टी आवर्जून पाळणे गरजेचे आहे, टेड्रोस गेब्रेयेसस यांनी म्हटले आहे.


जग कोरोनाच्या विळख्यात! जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८७ लाखांहून अधिक
First Published on: June 20, 2020 1:51 PM
Exit mobile version