घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटजग कोरोनाच्या विळख्यात! जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८७ लाखांहून अधिक

जग कोरोनाच्या विळख्यात! जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८७ लाखांहून अधिक

Subscribe

जगभरात साधारण ६२ टक्के कोरोनाचे रुग्ण केवळ ८ देशांमध्ये आढळून आले आहेत.

दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. कोरोनाग्रस्तांच्या या वाढत्या संख्येने कोरोनाने संपुर्ण जगालाच आपल्या विळख्यात घेतल्याचे दिसत आहे. worldometers.info ने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे ८७ लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली असल्याने ही संख्या आता ८७ लाख ६६ हजार ३५ अशी झाली आहे तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ६२ हजारांवर पोहोचली आहे. तसेच ४६ लाख २७ हजार ८८३ रूग्ण बरे झाले आहेत.

जगभरात साधारण ६२ टक्के कोरोनाचे रुग्ण केवळ ८ देशांमध्ये आढळून आले आहेत. या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ५१ लाखांहून अधिक असल्याचे समजतेय. जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा सर्वाधिक अमेरिकेत झाला आहे. अमेरिकेमध्ये २२ लाखांहून अधिक लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याने तेथील संख्या ही २२ लाख ९७ हजार १९० अशी आहे. तर आतापर्यंत १ लाख २१ हजार ४०७ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

ब्राझीलनंतर रशिया, भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक

अमेरिकेमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ३३ हजार १५८ रुग्ण आढळून आले आहेत, तर ७१४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये ५५ हजार २०९ रुग्ण आढळून आले असून ४९ हजार ९० लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या ब्राझीलमध्ये १ लाख ३८ हजारांहून अधिक लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर ४९ हजार ९० लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे.भारतात आतापर्यंत ३ लाख ९६ हजार १८२ कोरोनाची लागण झाली आहे तर १२ हजार ९७० लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच २ लाख १४ हजार २०९ लोक कोरोना आजारापासून बरे झाले आहेत.

या ८ देशांमध्ये २ लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त

ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त ८ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली हे चार देश असे आहेत, जिथे ३० हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे.


देशात गेल्या २४ तासांत १४ हजार नव्या रुग्णांची नोंद; ३७५ लोकांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -