भारत बायोटेकची Covaxin लवकरचं WHO च्या यादीत होणार समाविष्ठ, २३ जूनला पार पडणार बैठक

भारत बायोटेकची Covaxin लवकरचं WHO च्या यादीत होणार समाविष्ठ, २३ जूनला पार पडणार बैठक

देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. यातच देशातील भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना लसीला लवकरचं जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समाविष्ट केले जाणार आहे. यामुळे ही लस घेणाऱ्या भारतीयांना आता अनेक देशांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे. यासंदर्भात २३ जूनला जागतिक आरोग्य संघटनेसह भारत बायोटेकची पूर्व बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागतिक आरोग्य संघटना कोव्हॅक्सिनला (EUL) आपत्कालीन वापरासाठी मान्यता देणार आहे.

कोव्हॅक्सिनला आपत्कालीन मान्यतेसाठी ९० टक्के कागदपत्रे सादर 

गेल्या महिन्यात भारत बायोटेकने सांगितले होते की, जागतिक आरोग्य संघटनेकडून कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी (ईयूएल) मान्यता मिळावी यासाठी ९० टक्के कागदपत्रे सादर केली आहेत. परंतु उर्वरित कागदपत्रे या माहिन्यात सादर केली जाणार आहेत. कोरोनाविरोधी कोव्हॅक्सिन लसीला WHO ची मान्यता मिळावी यासाठी भारत बायोटेक कंपनी विदेश मंत्रालायाशी समन्वय साधत आहे.

विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

भारत बायोटेक आणि आयसीएमआर कंपनीने एकत्र येत कोव्हॅक्सिन लसीची निर्मती केली आहे. सध्या या लसीला जागतिक आरोग्य संघटनेम्युकरमायकोसिस औषध वाटपात महाराष्ट्राशी भेदभाव केला नाही, केंद्र सरकारचे उच्च न्यायलयात स्पष्टीकरणने मान्यता न दिल्याने लस घेणाऱ्या भारतीयांना इतर देशांमध्ये प्रवेश मिळत नाही. यामुळे भारतातून परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अनेक अडचणी येत आहेत. परंतु या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्यास विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

देशात सध्या कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचा वापर केला जात आहे. तर आता स्पुटनिक व्ही या लसीसाही आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. यातील कोव्हिशील्ड लसीचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूड ऑफ इंडियामध्ये घेतले जात आहे तर कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन भारत बायोटेकमध्ये होत आहे. सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सिन लसीला अधिक महत्त्व आहे.


म्युकरमायकोसिस औषध वाटपात महाराष्ट्राशी भेदभाव केला नाही, केंद्र सरकारचे उच्च न्यायलयात स्पष्टीकरण


 

First Published on: June 17, 2021 5:04 PM
Exit mobile version