Coronavirus: कोरोनाव्हायरस विरुद्धच्या लढ्यात व्हेंटिलेटर का आवश्यक आहेत?

Coronavirus: कोरोनाव्हायरस विरुद्धच्या लढ्यात व्हेंटिलेटर का आवश्यक आहेत?

व्हेंटिलेटर वापराविना पडून, भाजप नगरसेविकेचा आरोप

भारताने या महिन्यात व्हेंटिलेटरच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी परदेशातूनही खरेदी करण्याच्या विचारात भारत आहे. पण व्हेंटिलेटर म्हणजे काय आणि काही रुग्णांना ते का आवश्यक आहेत? सोप्या भाषेत सांगायचे तर, व्हेंटिलेटर एक असे उपकरण आहे जे आपल्या फुफ्फुसांना शक्य नसते तेव्हा आपल्याला श्वास घेण्यास मदत करते. ते चेहऱ्यावर मास्क किंवा आपल्या श्वासनलीकेत घातलेल्या नळ्यांद्वारे आपल्या शरीरात ऑक्सिजन पोहोचवते. कोरोना व्हायरसच्या रुग्णाला जेव्हा श्वास घेण्यात त्रास होतो, त्यावेळी व्हेंटिलेटरची गरज लागते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बहुतेक लोक नवीन कोरोना व्हायरस (कोविड-१९) आजारासाठी विशेष उपचार घेतल्याशिवाय बरे होतात. सहापैकी एक रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या लोकांना जास्त धोका असतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.


हेही वाचा – Coronavirus: …म्हणून जर्मनीमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे


ज्यावेळी कोविड-१९ रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होते किंवा त्याच्या फुफ्फुसामध्ये द्रव भरला जातो आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, त्यावेळी व्हेंटिलेटर गरज भासते. सार्वजनिक आरोग्य संशोधन गट सीडीडीईपी (सेंटर फॉर डिसीज डायनेमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी) असा अंदाज वर्तवला आहे की, भारतात जेव्हा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा सध्या भारतातील ३० हजार ते ५० हजार व्हेंटिलेटरच्या क्षमतेपेक्षा भारताला दहा लाख व्हेंटिलेटरची आवश्यकता असेल. भारतात व्हेन्टिलेटर बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

बेंगळुरूमधील बायोडायझिन इनोव्हेशन ही कंपनी एक आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी पोर्टेबल, कमी किमतीच्या-रेस्पिरएड्स नावाच्या वस्तुचे उत्पादन करण्याचा प्रयत्न करीत आहे. नुकत्याच झालेल्या एका वृत्त वाहिनीच्या तपासणीत श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांकडून वाढीव किंमतीवर व्हेंटिलेटरची विक्री तसेच त्यांची साठेबाजी उघडकीस आली आहे.

 

First Published on: March 31, 2020 4:58 PM
Exit mobile version