बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग का होतो?; शास्त्रज्ञांनी केला खुलासा

बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग का होतो?; शास्त्रज्ञांनी केला खुलासा

कोरोना विषाणूपासून बरे झालेल्या रूग्णाला पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या घटना समोर येत आहेत. दक्षिण कोरियामध्ये नुकतेच १४१ लोक पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. असं का होत आहे? लोकांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग का होत आहे? याचं उत्तर कोरियन डॉक्टरांना सापडलं आहे. लोकांना पुन्हा कोरोनाची लागण का होत आहे? याचं उत्तर दक्षिण कोरियामधील वैज्ञानिक आणि डॉक्टरांना सापडलं आहे. दक्षिण कोरियामध्ये पुन्हा कोरोना पॉझिटिव्हच्या १४१ घटनांचा अभ्यास केला जात आहे.

कोरिया सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (केसीडीसी) च्या प्रयोगशाळेत हा अभ्यास चालू आहे. इथल्या शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की, विषाणू मानवी शरीरात असलेल्या टी-लिम्फोसाइट्स, प्रतिरक्षा पेशींवर आक्रमण करत निष्क्रिय करत आहे. टी-लिम्फोसाइट्सच्या अकार्यक्षमतेमुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे. कारण एकदा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास ती पुन्हा तयार करण्यास कित्येक महिने लागतात. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, एकदा कोरोना विषाणू शरीरावर आक्रमण केल्यानंतर तो काही दिवस हालचाल करत नाही. मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, असं जेव्हा कोरोना विषाणूला दिसतं तेव्हा कोरोना विषाणू प्रहार करतो. म्हणजेच आपल्या शरीरावर कोरोनाचा संसर्ग पुन्हा दिसू लागतो.


हेही वाचा – Lockdown: घरगुती हिंसाचारात वाढ, महिलांच्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल


कोरिया युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ फार्मसी मधील विषाणूशास्त्रज्ञ किम जोंग यांनी सांगितलं की, जवळपास एक महिन्यापूर्वी आम्ही ज्या रूग्णाला बरं केलं, आता त्याला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तिच्या प्रतिकारशक्तीची तपासणी केली असता, ती खूप कमकुवत असल्याचं आढळलं. याचाच फायदा कोरोना विषाणू घेत आहे. दक्षिण कोरिया, अमेरिका आणि चीन येथे एकत्र केलेल्या अभ्यासानुसार हे स्पष्ट झालं आहे की, कोरोना विषाणू थेट शरीराच्या टी-लिम्फोसाइट्सवर आक्रमण करत आहे. यामुळे मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. टी-लिम्फोसाइट्स मानवी शरीरात उपस्थित असलेल्या रोगप्रतिकारक पेशी आहेत ज्या कोणत्याही रोगाशी लढायला मदत करतात. जर विषाणू त्यांना कमकुवत करत असेल तर आपण आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायला हवी. जेणेकरून आपला कोरोनापासून आपला बचाव होऊ शकतो.

 

First Published on: April 17, 2020 1:11 PM
Exit mobile version