kabul airport attack: काबूल हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू; जो बायडेन म्हणाले,’आता चुकीला माफी नाही’

kabul airport attack: काबूल हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू; जो बायडेन म्हणाले,’आता चुकीला माफी नाही’

Joe Biden : काबुल सोडण्याच्या बायडन यांच्या निर्णयाचा अमेरिकन जनतेकडून विरोध

अमेरिकेने बुधवारी आपल्या नागरिकांना दहशतवादी हल्ला होण्याच्या अनुषंगाने काबूल विमानतळ सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काल, गुरुवारी रात्री काबूल विमानतळावर आयएसआयएसद्वारे तीन आत्मघाती हल्ले (Kabul Attack) झाले. ज्यामुळे संपूर्ण काबूल हादरले आहे. या दहशतवादी हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इशारा (joe Biden warns kabul attackers) दिला आहे. ‘या हल्ल्यांची किंमत चुकवावी लागणार असून आम्ही हे विसरणार नाही आणि आता दहशतवाद्यांच्या चुकीला माफी नाही. आम्ही दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करू. अफगाणिस्तान (Afghanistan) राहत असलेल्या आमच्या नागरिकांना वाचवू’, असे जो बायडेन म्हणाले.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुढे म्हणाले की, ‘नागरिकांचे बचावकार्य सुरू राहिलं. गरज लागली तर अतिरिक्त अमेरिकन सैन्य अजून अफगाणिस्तानला पाठवू.’ दरम्यान काबूल विमानतळांवरील हल्ल्यात ७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ अमेरिकन सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत. यावेळी महिलांनी अक्षरशः भिंतीवरुन उड्या मारल्या. माहितीनुसार, हल्ल्यांमध्ये १४० पेक्षा अधिक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यामुळे संपूर्ण काबूल हादरलं आहे.

जो बायडेन म्हणाले की, ‘ज्यांनी हा हल्ला केला आहे, त्यांना आम्ही माफ करणार नाही आणि हे विसरणारही नाही. आता आम्ही तुमचा खात्मा करू. तुम्हाला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल. ज्याने हा हल्ला केला आहे, त्या आयएसआयएस नेत्याला चांगलंच ओळखून आहे. आम्ही रस्ता काढणार आणि न बोलता मोठे लष्करी ऑपरेशन करून त्यांना शोधून काढू, जिथे कुठे असतील तिथून. ‘

‘अशा परिस्थितीत या महिन्याच्या अखेपर्यंत अफगाणिस्तामधून आपल्या सर्व सैनिकांना अमेरिका बाहेर काढेल. आम्हाला कोणत्याही परिस्थिती ही मोहीम पार पाडायची आहे आणि आम्ही असे करू. मी त्यांना असेच करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही दहशतवाद्यांना घाबरणार नाही. आमची मोहीम काहीही झालं तरी थांबवू देणार नाही. आमच्या सैनिक आणि कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानातून बाहेर काढणे सुरू ठेवू’, असे जो बायडेन म्हणाले.

तसेच बायडेन पुढे म्हणाले की, ‘आम्ही आज ज्या लोकांना गमावले आहे, त्यांनी स्वातंत्र्यासाठी आपला प्राण दिला आहे. सुरक्षेची सेवा, दुसऱ्याची सेवा आणि अमेरिकेच्या सेवेमध्ये प्राण गमावले आहेत. अफगाणिस्तानात लोकशाही सरकारची स्थापना करण्यासाठी आम्ही आमच्या सैनिकांचे बलिदान देत राहू. २० वर्षांचे युद्ध संपवण्याची हीच वेळ आहे.’


हेही वाचा – अफगाणिस्तानमधून मोठ्या संख्येने लोकांना बाहेर काढण्यात आलेय, ब्रिटनच्या पंतप्रधानांची माहिती


 

First Published on: August 27, 2021 9:03 AM
Exit mobile version