विंग कमांडर अभिनंदन सुट्टीवर न जाता श्रीनगरच्या एअरबेसवर परतले

विंग कमांडर अभिनंदन सुट्टीवर न जाता श्रीनगरच्या एअरबेसवर परतले

विंग कमांडर वर्थमान अभिनंदन

वायुसेनेचे पायलट आणि पाकच्या एफ १६ लढाऊ विमानाला पाडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्तमान सुट्टीवर गेले आहेत असे सांगितले गेले होते. मात्र अभिनंदन सुट्टीवर न जाता श्रीनगर एअरबेसवर गेले आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनंदन यांना सुट्टीवर पाठवण्यात आले होते. ते चेन्नईतील त्यांच्या घरी गेलेच नाही तर त्यांनी श्रीनगर येथील स्क्वाड्रनजवळ जाणे त्यांनी पसंद केले.

४ आठवड्यांच्या सुट्टीवर

विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची पाकिस्तानने सुटका केल्यानंतर रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांची चौकशी आणि उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना ४ आठवड्यांच्या सीक लिव्हवर जाण्याचा सल्ला दिला गेला. या काळामध्ये मडेकिल बोर्ड त्यांच्या फिटनेसची तपासणी करेल. त्याच आधारावर अभिनंदन यांना लढाऊ विमान चालवण्याची परवानगी द्यायची की नाही हे ठरवले जाईल.

अभिनंदन सध्या श्रीनगरमध्ये

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन यांची पाकिस्तानकडून सुटका झाल्यानंतर दोन आठवडे त्यांची वैद्यकिय तपासणी आणि चौकशी झाली. त्यानंतर अभिनंदन चेन्नईत राहणाऱ्या आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकले असते. मात्र त्यांनी श्रीनगरला येणे पसंद केले ज्याठिकाणी त्यांचे स्क्वाड्रन आहे. अभिनंदन यांनी लढाऊ विमान उडवण्याचे काम पुन्हा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या बसवर हल्ला केला. याचा बदला घेत भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. त्यानंतर २७ फेब्रुवारीला भारतीय हवाई हद्दीचे पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी उल्लंघन केले. या विमानाला पाडण्याच्या प्रयत्नात अभिनंदन चालवत असलेले लढाऊ विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्यांनी त्यांना ताब्यात घेतले. या आधी अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान पाडले. तब्बल तीन दिवसानंतर म्हणजे १ मार्चला अभिनंदन यांची पाकिस्तानने सुटका केली.

First Published on: March 27, 2019 3:29 PM
Exit mobile version