मास्क घातल्यावर ही तुम्ही आहात तसेच दिसाल, फोटोग्राफर्सने लढवली शक्कल!

मास्क घातल्यावर ही तुम्ही आहात तसेच दिसाल, फोटोग्राफर्सने लढवली शक्कल!

सध्या जगभरात कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचं काम सुरू आहे. पण तोपर्यंत तरी लोकांना आपल्या दैनंदिन व्यवहारात वावरताना मास्क बंधनकारक झालं आहे. कधीही घरा बाहेर पडताना आता मास्क लावणं अनिवार्य आहे. परंतु दैनंदिन जीवनात या मास्कमुळे बर्‍याच अडचणी देखील निर्माण झाल्या आहेत. पण आपण हे मास्क घातल्यावर आपल्याला ओळखणे कठीण आहे कारण मास्कमुळे नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकून जाते.

कोट्टायममधील इटमानूर येथील डिजिटल फोटोग्राफर, बिनेश जी पॉल यांनी या संकटावर मात करण्यासाठी एक खास अनोखा मुखवटा तयार केला आहे. हे मास्क घातल्यावर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण हे मास्क घालून देखील इतर लोक आपल्याला पटकन ओळखतील. अशाच प्रकारचा हा मुखवटा तयार केला आहे.

असा तयार केला फोटो

“सुरूवातीला त्या व्यक्तीचा हाय रिझोल्यूशन फोटो कॅमेर्‍यामध्ये घेतला जातो. मग प्रतिमा एका विशिष्ट कागदावर घेतली जाते. नंतर,  विशिष्ट भाग कापला जातो. नंतर कपड्यावर तो फोटो ठेवून हा रेझॉल्यूशनवर ठेवला जातो. त्यानंतर त्या माणसाच्या हनुवटीचे माप घेतले जाते. ” या सगळ्या प्रकाराला २० मिनीटांचा वेळ लागतो. त्यासाठी ६० रूपये किंमत मोजावी लागणार आहे.

मास्क तयार करण्याविषयी पॉल म्हणाला, “मी गेल्या दोन दिवसांत १ हजार मुखवटे तयार केले आहेत. त्यानंतर मला ५००० च्या ऑर्डर मिळवल्या आहेत. माझ्याकडे अनेक प्रश्न आहेत. मला वाटते की यापूर्वी कोणीही हे केले नाही. एकदा आम्हाला आणखी ऑर्डर मिळाल्यावर आम्ही मुखवटाच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता विविधता आणू.  गेले १० वर्ष पॉल फोटोग्राफी या व्यवसायात आहे. त्याचे कुटुंबसुद्धा जवळजवळ ५५ वर्षांपासून फोटोग्राफीच्या व्यवसायात आहे.


हे ही वाचा – रामायण मालिकेच झालं होतं मराठीत डबिंग पण आता होणार ‘या’ वाहिनीवर प्रदर्शित!


 

First Published on: May 25, 2020 8:35 AM
Exit mobile version